जेएनएन, मुंबई. Maharashtra 12th Result 2025 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा (HSC) निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी अधिकृतरीत्या निकालाची घोषणा केली. या वर्षी महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नाशिक विभागात एकूण एक लाख 58 हजार 593 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी एक लाख 57 हजार 842 विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते तर एक लाख 44 हजार 136 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाचा एकूण निकाल 91.31 आहे तर नऊ विभागांमध्ये नाशिकचा सातवा क्रमांक आहे. 

विभाग निहाय निकाल

पुणे - 91.32 

नागपूर  - 90.52 टक्के

संभाजी नगर  - 92.24 टक्के

    मुंबई  - 92.93 टक्के

    कोल्हापूर - 93.64 टक्के

    अमरावती - 91.43 टक्के

    नाशिक - 91. 31 टक्के

    लातूर - 89.46 टक्के

    कोकण - 96.74 टक्के

    बारावीचा विभाग निघाय निकाल

    कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?

    विज्ञान- 97.35 टक्के

    कला- 80.52 टक्के

    वाणिज्य- 92.68

    व्यवसाय अभ्यासक्रम- 83.03 टक्के

    आयटीआय- 82.03 टक्के

    खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील

    परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय, विद्यार्थी इतर अधिकृत पोर्टलवर देखील त्यांचे निकाल तपासू शकतील.

    निकाल कसा तपासायचा

    - सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

    - होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.

    - तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

    - तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा

    परीक्षा कधी झाल्या?

    या वर्षी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत झाली होती. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत झाली. दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली.