जेएनएन, मुंबई. Maharashtra Board 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये 75 आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,49,932 इतकी आहे. 60ते 74.99 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4,07,438 इतकी आहे. तर 45 ते 59.99 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5,80,902 इतकी आहे. या वर्षी महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरायचा आहे. त्याची मुदत 6 मे 2025 म्हणजे उद्या पासून ते मंगळवार 20 मे 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिकृत सकेंतस्थळावर जाऊन हा अर्ज भरता येणार आहे. प्रत्येक विषयासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
हेही वाचा - Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या निकालाबाबत शंका आहे का? असे करा पेपरचे री-इव्हॅल्युएशन
उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी घेतल्याशिवाय विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे उत्तराची फोटो कॉपी मिळवण्यासाठी विद्यार्थांना 6 मे ते 20 मे या काळात अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर ही फोटो कॉपी विद्यार्थांना हस्तपोच किंवा ऑनलाइन किंवा रजिस्टार पद्धतीने देण्यात येणार आहे. एका विषयाच्या फोटोकॉपीसाठी 300 रुपये आकारले जाणार आहेत. पुनरमुल्यांकनासाठी 300 रुपये तर छाया पत्रिकेसाठी 400 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल.
हेही वाचा - MSBSHSE 12th Result Update: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; कोणत्या विभागाने मारली बाजी
निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया
- ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. माहिती http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शुल्क ऑनलाईन भरायचे आहे.
- गुणपडताळणीसाठी मंगळवार 6 मे ते मंगळवार 20 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. शुल्क प्रती विषय ₹50/- आहे.
- उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी मंगळवार, 05 मे ते मंगळवार, 20 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. शुल्क प्रती विषय ₹400/- आहे.
- पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून 5 दिवसात संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा. शुल्क प्रती विषय ₹300/- आहे.
- JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची गुणपडताळणी, छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने केले जाईल. यासाठी त्यांनी प्रवेशपत्राची प्रत व विषय शिक्षकाचा अभिप्राय अपलोड करावा लागेल.
- माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्य ज्ञान (G.K.) या ऑनलाईन विषयांचेही पुनर्मूल्यांकन केले जाईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणे आवश्यक आहे.