जेएनएन, मुंबई. HSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने यंदा बारावीची परीक्षा दिली. ती बारावी उत्तीर्ण झाली असून तिला 85.11 टक्के मिळाले आहेत.

तिला भौतिकशास्त्रात 83, रसायनशास्त्रात 91, जीवशास्त्रात 98 व गणितामध्ये 94 गुण मिळाले असल्याची माहिती आहे. 

आज बारावीचा निकाल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांसाठी निकालाची लिंक आता अ‍ॅक्टीव्हेट झाली आहे. आता विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

कसा पाहू शकता निकाल?

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in वर भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या 12 वी एचएससी रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका.
  • आता महाराष्ट्र बोर्ड 12 वी रिझल्ट 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर मार्कशिट पीडीएफ पाहा आणि त्यांना डाऊनलोड करा.

कुठे पाहू शकता निकाल?