जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे. मात्र, जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. त्यामुळे आता Ladki Bahin Yojana August Installment कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
ऑगस्ट महिन्यात अनेक सण
27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमण होणार आहे. तर, महिलांच्या लाडक्या गौरी घ्या 31 रोजी येणार आहेत. तर 25 ऑगस्टला हरतालिका व्रत आहे. त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत. महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे. त्यामुळे लाडका भाऊ म्हणजे महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या सणासुदीत लाडक्या बहिणांच्या खात्यात पैसे टाकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑगस्टचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana August Month Installment)
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात. त्यांनंतर हप्ता दिला जातो. जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्टच्या हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये (These Women Will Not Take Benefit Of Ladki Bahin Yojana)
गेल्या महिन्यात X वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की, सुमारे 26.34 लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत. त्यांनी सांगितले की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, जून 2025 पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आलेले आहेत, असे त्यांन म्हटले होते. या लाभार्थांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची कारणे (Reasons for Ladki Bahin Yojana Ineligible)
- लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.
- जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
- अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ऑगस्टचे ₹1500; काय आहे नेमकं कारण?