जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana Latest Update: महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वकांंशी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत 11 हफ्ते हे यशस्वीरित्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा 12 वा हफ्ता म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्याचे काय झाले हे योजनेतील लाभार्थी आता विचारत आहेत. दरम्यान या योजनेतून आपल्या खात्यात पैसे आले असतील तर ते कसे तपासयाचे याची माहिती आपण जाणून घेऊया. (How to check Ladki Bahin Yojana installment has been deposited in bank account)
लाडकी बहिण योजनेचे कोट्यवधी लाभार्थी आता जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहे. आता वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील 2.47 कोटींहून अधिक महिलांसाठी सरकारने स्पष्टता अद्याप दिलेली नाही, पण संकेत असे आहेत की, जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana June Installment) मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता आपण पैसे कसे तपासायचे याची प्रक्रिया जाणून घेऊया…
खात्यात दीड हजार रुपये जमा झाले की नाही असे तपासा.. (How to check Ladki Bahin Yojana Installment)
नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा. सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास बनवण्यात आले आहे.
लॉगिन कसे करावे: अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून अॅपमध्ये लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि "लाडकी बहीण योजना" पर्याय निवडा.
मंजूर यादी तपासणी: अॅपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
पोर्टलवर तपासणी कशी करायची?
अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि "मंजूर यादी" विभागात जा आणि तपासा.
आवश्यक माहिती टाका: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
स्थिती तपासा : अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.