जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याच दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana June Installment) मिळण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या हप्त्या बाबत कोणतीही घोषणा नाही
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. लाडक्या बहिणींच्या थेट बँकेत हे पैसे जमा होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला. अद्याप जून महिन्याच्या हप्त्या बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
3000 रुपये मिळणार?
त्यामुळे जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
लाडकी बहिण योजनेचा 12वा हप्ता कधी मिळणार? (when is deposited Ladki Bahin Scheme June Month Installment)
आतापर्यंत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा हप्ता वितरणाची प्रत्येक महिन्यासाठी एकच ठोस तारीख नसल्याने ही समस्या येत आहे. पण संकेत असे आहेत की, जून 2025 चा 1500 रुपयांचा 12 वा हप्ता चार दिवसांच्या आत किंवा त्यापुढे काही दिवसांत वितरित केला जाईल. यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतिक्षा आहे.