नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) आतुरतेने वाट पाहत आहेत. जर सरकारने आठवा वेतन आयोग लागू केला, तर त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ निश्चित आहे. ही वाढ प्रामुख्याने 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असेल.

जर सरकारने 2.28, 2.57 किंवा 2.86  चा फिटमेंट फॅक्टर लागू केला, तर लेव्हल 1 ते लेव्हल 18 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि तुमच्या पे ग्रेडनुसार तुमचे नवीन बेसिक सॅलरी  किती होऊ शकते, हे आपण समजून घेऊया.

'फिटमेंट फॅक्टर' (Fitment Factor) म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर हा एक प्रकारचा गुणक किंवा सूत्र आहे, जो नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्याच्या जुन्या मूळ पगाराचे नवीन पगारात रूपांतर करण्यासाठी वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, सरकार जुन्या पगारात एका निश्चित घटकाने वाढ करून नवीन पगार निश्चित करते. उदाहरणार्थ, जर फिटमेंट फॅक्टर 2.57 असेल, तर ₹20,000 चा मूळ पगार थेट सुमारे ₹51,400  होईल.

तीन वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टर्सवर आधारित पगाराचा अंदाज

    जर सरकारने वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर्स निवडले, तर किमान Level 1 आणि कमाल Level 18 वरील कर्मचाऱ्यांसाठी पगाराची गणना खालीलप्रमाणे आहे:

    1. 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास, किमान मूळ पगार (लेव्हल 1) ₹18,000 वरून ₹41,040 पर्यंत वाढेल, तर कमाल पगार (लेव्हल 18) ₹5,70,000 पर्यंत पोहोचेल.

    2. जर 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू केला तर किमान मूळ पगार (लेव्हल 1) ₹46,260 आणि कमाल पगार ₹6,42,500 असेल.

    ग्रेडसध्याचा बेसिक पेसंभाव्य बेसिक पे
    Level 118,00041040
    Level 219,90045372
    Level 321,70049476
    Level 425,50058140
    Level 529,20066576
    Level 635,40080712
    Level 744,900102372
    Level 847,600108528
    Level 953,100121068
    Level 1056,100127908
    Level 1167,700154356
    Level 1278,800179664
    Level 13118,500270180
    Level 13131,100298908
    Level 14144,200328776
    Level 15182,200415416
    Level 16205,400468312
    Level 17225,000513000
    Level 18250,000570000

    3. 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास, किमान मूळ वेतन ₹18,000 वरून ₹51,480 पर्यंत वाढेल आणि लेव्हल 18 अधिकाऱ्यांचे वेतन ₹7,15,000 पर्यंत पोहोचेल.

    ग्रेडवर्तमान बेसिक पेसंभाव्य बेसिक पे
    Level 118,00046260
    Level 219,90051143
    Level 321,70055769
    Level 425,50065535
    Level 529,20075044
    Level 635,40090978
    Level 744,900115393
    Level 847,600122332
    Level 953,100136467
    Level 1056,100144177
    Level 1167,700173989
    Level 1278,800202516
    Level 13118,500304545
    Level 13131,100336927
    Level 14144,200370594
    Level 15182,200468254
    Level 16205,400527878
    Level 17225,000578250
    Level 18250,000642500

    हा निर्णय महत्त्वाचा का आहे?

    'फिटमेंट फॅक्टर' जेवढा जास्त असतो, तेवढी कर्मचाऱ्याच्या पगारात जास्त वाढ होते. सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) 2.57  चा फॅक्टर लागू केला होता, परंतु आठव्या वेतन आयोगात (8th Pay commission dashboard) तो 2.86  पर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे.

    ग्रेडवर्तमान बेसिक पेसंभाव्य बेसिक पे
    Level 118,00051480
    Level 219,90056914
    Level 321,70062062
    Level 425,50072930
    Level 529,20083512
    Level 635,400101244
    Level 744,900128414
    Level 847,600136136
    Level 953,100151866
    Level 1056,100160446
    Level 1167,700193622
    Level 1278,800225368
    Level 13118,500338910
    Level 13131,100374946
    Level 14144,200412412
    Level 15182,200521092
    Level 16205,400587444
    Level 17225,000643500
    Level 18250,000715000