T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2026 ही या स्पर्धेची दहावी आवृत्ती असेल, जी भारत आणि श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. श्रीलंकेने यापूर्वी 2012 मध्ये तर भारताने 2016 मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून भारतात पाच आणि श्रीलंकेतील तीन मैदानांवर एकूण 55 सामने खेळले जातील. इटलीचा संघ प्रथमच पुरुष टी20 विश्वचषकात खेळणार आहे.
Loading...