नवी दिल्ली. 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये झाला. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा व आतापर्यंत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाला 131 कोटी रुपये बक्षीस दिले. आता, आयसीसीनेही बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. विजेत्या भारतापासून ते 20 व्या स्थानावर असलेल्या ओमानपर्यंत, सर्वांवर पैशांचा वर्षाव झाला आहे.

2026 च्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी समारोपानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील खेळाडूंच्या बक्षीस रकमेचे अंतिम वितरण यूएस डॉलर्स 11.25 दशलक्ष (₹1 अब्ज, 39 कोटी, 4 लाख, 43 हजार) केले आहे. आयसीसीच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, 2024 मध्ये जाहीर झालेल्या आयसीसी बक्षीस रकमेत झालेल्या विक्रमी वाढीच्या अनुरूप हे आहे.

भारतीय संघाला 24 कोटी 28 लाख रुपये मिळाले आहेत. अंतिम फेरीतील  पराभूत संघ न्यूझीलंडला 13 कोटी रुपये  मिळाले. उपांत्य फेरीतील पराभूत  दक्षिण आफ्रिकेला 9 कोटी आणि इंग्लंडला अंदाजे 8 कोटी रुपये मिळाले.

आयसीसी प्राइस मनी

  • भारत – 2,639,423 डॉलर (24,28,49,351 रुपये)
  • न्यूझीलंड – 1,422,692 डॉलर (13,08,91,789 रुपये)
  • दक्षिण आफ्रिका – 1,005,577 डॉलर (9,24,89,855 रुपये)
  • इंग्लंड – 974,423 डॉलर (8,96,49,741 रुपये)
  • वेस्ट इंडिज –  538,269 डॉलर (4,95,19,222 रुपये)
  • पाकिस्तान - 522,692 डॉलर (4,80,86,182 रुपये)
  • झिम्बाब्वे – 491,538 डॉलर (4,52,20,103 रुपये)
  • श्रीलंका - 475,962 डॉलर (4,37,87,155 रुपये)
  • अफगाणिस्तान – 309,808 डॉलर (2,85,01,248 रुपये)
  • ऑस्ट्रेलिया – 309,808 डॉलर (2,85,01,248 रुपये)
  • अमेरिका – 309,808 डॉलर (2,85,01,248 रुपये)
  • स्कॉटलंड – 278,654 डॉलर (2,56,35,189 रुपये)
  • आयर्लंड – 271,731 डॉलर (2,49,98,298 रुपये
  • इटली - 256,154 डॉलर (2,35,62,748 रुपये)
  • नेदरलँड्स – 256,154 डॉलर (2,35,62,748 रुपये)
  • संयुक्त अरब अमिराती - 256,154 डॉलर (2,35,62,748 रुपये)
  • नेपाळ – 256,154 डॉलर (2,35,62,748 रुपये)
  • कॅनडा - 225,000 डॉलर (2,06,92,575 रुपये)
  • नामिबिया –225,000 डॉलर (2,06,92,575 रुपये)
  • ओमान –  225,000 डॉलर (2,06,92,575 रुपये)

हे ही वाचा -ICC Rankings Update: संजूने घेतली गरुडझेप, बुमराह आणि अक्षरचाही फायदा; वरुणने गमवली नंबर 1 ची रॅंकिंग