नरेंद्र दामोदरदास मोदी 26 मे 2014 पासून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. ते वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2001 ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहणारे पंडित नेहरू यांच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत. त्यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र भारतात जन्मलेले नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत.