मुंबई. Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना अलीकडेच तिच्या खेळामुळे नव्हे तर मैदानाबाहेर तिने घातलेल्या कपड्यांमुळे इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. स्मृती मानधनाचे बंगळुरू पॅलेसमधील एका हाय-प्रोफाइल ब्रँड इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काहींनी तिला ट्रोल करायला सुरू केले. एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या शरीरयष्टीवरून तिला हिणवणे आणि तिची तुलना पुरुषाशी करणे, यावरून इंटरनेटवर नवा वाद निर्माण झाला आहे.
बेंगळुरूमधील एका कार्यक्रमातील स्मृतीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्मृतीच्या पांढऱ्या गाऊनमधून खुलून दिसणाऱ्या तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. तर चांगल्यातही वाईट शोधून काढणाऱ्या काहींनी तिच्या फोटोंवर असभ्य टिप्पण्या करायला सुरूवात केली. काहींनी तिची खिल्ली उडवणारे मीम्स पोस्ट केले. ज्यामुळे प्रसिद्ध खेळाडूंमध्येही बॉडी पोलिसिंग किती खोलवर रुजलेले आहे हे उघड झाले.
ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडत स्मृतीच्या लूकची तुलना एका चित्रपटातील सलमान खानच्या स्त्री लुकशी केली. चित्रपटात सलमानने एका प्रसंगात परिधान केलेल्या कपड्यांशी स्मृतीच्या गाऊनची तुलना करून तिची खिल्ली उडवण्यात आली. स्मृती मानधनाच्या फोटोबरोबर या ट्रोलर्सनी सलमान खानचा फोटो लावला आणि तिचं बॉडी शेमिंग करायला सुरुवात केली.
Huh?! Body shaming Smriti Mandhana?! She's a world champion! An absolute queen! These morons needs a tight 👋
— Akancha Srivastava (@AkanchaS) December 21, 2025
How do we not know how to respect women, achievers? It's shameful. pic.twitter.com/nmCdTYNZEX
दरम्यान स्मृतीच्या एका फॅनने तिचे बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरत म्हटले की, स्मृती मानधनाचे तुम्ही बॉडी शेमिंग करताय का.. स्मती एक विश्वविजेती चॅम्पियन आहे, ती खऱ्या आयुष्यातील राणी आहे. स्मृतीचे जे बॉडी शेमिंग करत आहेत, त्या मुर्खांना आता धडा शिकवण्याची गरज आहे. आपल्याला महिलांचा आणि कतृत्ववान व्यक्तींचा आदर कसा करायचा, हे कळत नाही का? तुम्ही केलेली ही गोष्ट खूपच लाजीरवाणी आहे.
आयुष्यातील वादळानंतर सावरत आहे स्मृती -
स्मृती मानधना आणि तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यांचे गेल्या महिन्यात लग्न होणार होते. लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर पलाशचे दुसऱ्या तरुणीसोबत असणारे नाते समोर आल्याने लग्न थांबवावे लागले. स्मृतीने आपण क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत असून खेळाशिवाय अन्य कशावरच प्रेम नसल्याचे जाहीर केले.
मैदानावर पुनरागमन करण्यापूर्वी तिने काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती, जिथे तिला चाहत्यांच्या प्रेमासोबतच ट्रोलर्सच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला.
