नवी दिल्ली. Amit Mishra Retirement:  आर अश्विनच्या निवृत्तीनंतर, टीम इंडियाच्या आणखी एका फिरकी गोलंदाजाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा लेग स्पिनर अमित मिश्रा आहे, जो सतत टीम इंडियापासून दूर होता आणि आता त्याने त्याच्या 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

अमित मिश्राने आयपीएलमध्ये 3 वेळा हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. या फॉरमॅटमध्ये असे करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय त्याने भारतासाठी उत्कृष्ट गोलंदाजी देखील केली आहे. निवृत्तीनतर तो आता  जगातील इतर टी-20 लीगमध्ये खेळू शकतो.

अमित मिश्राने क्रिकेट कारकिर्दीला दिला निरोप 

खरं तर, 42 वर्षीय माजी भारतीय लेग-स्पिनर अमित मिश्रा याने आयएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की,

"क्रिकेटमधील ही 25 वर्षे माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिली आहेत. मी बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी खेळाडू आणि कुटुंब यांचे मनापासून आभार मानतो. चाहत्यांचेही त्यांच्या अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो, ज्यामुळे माझा प्रवास अधिक खास झाला. क्रिकेटने मला असंख्य आठवणी आणि अमूल्य धडे दिले आहेत आणि मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण ही एक आठवण बनली आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन."

    अमित मिश्राचा सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठे क्रिकेट करिअर- 

    अमित मिश्राच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 76, 64 आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. अमितने शेवटचा एकदिवसीय सामना 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्याच वर्षी त्याने शेवटचा कसोटी सामनाही खेळला होता. त्याने शेवटचा टी-20 सामना 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

    एवढेच नाही तर अमित मिश्राची क्रिकेट कारकीर्द  क्रिकेटचा देव म्हटले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त होती. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधील आपला 24 वर्षांचा प्रवास संपवला, तर अमितची कारकीर्द 25 वर्षे टिकली.

    अमित मिश्रा आकडेवारी-

    • 22 कसोटी सामन्यांमध्ये 648 धावा आणि 76 विकेट्स घेतल्या
    • एकदिवसीय - 36 सामन्यांमध्ये 43 धावा, 64 विकेट्स घेतल्या.
    • टी20-10 सामन्यात 0 धावा, 16 बळी घेतले
    • आयपीएल - 162 सामन्यात 381 धावा, 174 विकेट्स घेतल्या