जेएनएन, नागपूर. Ashadhi Wari 2026: पंढरपूरला लाखो वारकरी विठलाच्या भेटीसाठी येतात परंतु, पंढरपूरातून मार्गस्थ होताना बुधवार दिवस टाळलो जाते. अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. यामागे श्री विठ्ठलाविषयीची गाढ श्रद्धा आणि पौराणिक मान्यता दडलेली आहे. जाणून घेऊया पंढरपूरातून बुधवारी परतीचा प्रवास का केला जात नाही. 

भगवान श्रीकृष्णाचा जन्म
वारकरी संप्रदायात बुधवार हा श्री विठ्ठलाचा वार मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला बुधवारी झाला होता. श्री विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचेच साकार रूप मानले जात असल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

याच श्रद्धेमुळे वारकरी बुधवारी पंढरपूरातून परतीचा प्रवास सुरू करत नाहीत. त्याऐवजी ते पंढरपुरातच मुक्काम करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात, भजन-कीर्तन, हरिपाठ, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. संपूर्ण दिवस विठ्ठलभक्तीत घालवल्यानंतरच ते दुसऱ्या दिवशी आपल्या गावी परतीचा प्रवास सुरू करतात.

वारकरी संप्रदायातील ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, विठ्ठलाशी असलेल्या भावनिक नात्याचीही साक्ष देते. शतकानुशतके ही परंपरा अखंडपणे जपली जात असून आजही लाखो वारकरी तिचे निष्ठेने पालन करतात.

हेही वाचा: Ashadhi Wari 2026 पंढरपूरच्या विठुरायाच्या कपाळी भक्तांच्या पायाची धूळ का लावली जाते?

हेही वाचा: विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग... पंढरपूरच्या दैवताला इतकी नावे का? जाणून घ्या प्रत्येक नावामागील इतिहास आणि अर्थ

Disclaimer:-''या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासमोर सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याशिवाय, याच्या कोणत्याही वापराची जबाबदारी स्वतः वापरकर्त्यावर राहील.