जेएनएन, नागपूर. Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी "ज्ञानोबा-तुकोबा"चा गजर करत, तहान-भूक विसरून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचतात. आपल्या भक्तांच्या या अथक भक्तीला आणि कष्टांना विठ्ठलही तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देतो, असे वारकरी संप्रदायात मानले जाते. म्हणूनच विठ्ठलाच्या पूजेदरम्यान त्याच्या कपाळावर चंदनाच्या टिळ्यासोबत वारकऱ्यांच्या पायाची धूळही लावण्याची अनोखी परंपरा आहे.
वारकऱ्यांच्या पायाची धूळ कपाळावर लावण्यामागील श्रद्धा
वारकरी संप्रदायातील प्रचलित आख्यायिकेनुसार, आपल्या भक्तांना आपल्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो याचं विठ्ठलाला खूप वाईट वाटतं म्हणूनच विठ्ठल म्हणतात माझे भक्त माझ्यासाठी एवढे कष्ट घेतात तर मी त्यांच्या पायाची धूळ कपाळावर लावून मिरवेन.
कसा तयार केला जातो हा टिळा?
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील परंपरेनुसार, रात्री मंदिर बंद झाल्यानंतर दिवसभर भक्त ज्या मार्गाने दर्शनासाठी गेले त्या रांगेतील माती गोळा केली जाते. ही माती चाळून त्यामध्ये चंद्रभागा नदीचे पाणी आणि अबीर मिसळला जातो. त्यानंतर तयार झालेला हा पवित्र मातीचा टिळा दररोज विठ्ठलाच्या कपाळावर लावला जातो. वारकरी संप्रदायात या टिळ्याला भक्तांच्या चरणरजेचे प्रतीक मानले जाते.
हेही वाचा: Ashadhi wari 2026: पंढरीचा विठुराया आणि वारकरी गळ्यात तुळशीची माळ का घालतात? जाणून घ्या परंपरेमागील महत्त्व
Disclaimer:-''या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासमोर सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याशिवाय, याच्या कोणत्याही वापराची जबाबदारी स्वतः वापरकर्त्यावर राहील.
