जेएनएन, नवी दिल्ली: Diwali Padwa 2026 Wishes In Marathi : दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुक्ल प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व असून तो पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि नात्यातील गोडवा जपणारा सण आहे. या निमित्ताने आपल्या प्रियजना खास शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून विश करूया…

Diwali Padwa Marathi Wishes and Quotes

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पती-पत्नीचं नातं अजून पक्के व्हावे
प्रेमात नेहमी नवचैतन्य यावे
विश्वासाने फुलो संसार
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा
तुमच्या नात्यात सदैव राहून गोडवा
दिव्याच्या तेजाने उजळो तुमच्या आयुष्याची वाटा
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश (Wishes)

    • साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्याच्या आणि पाडवा औक्षणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
    • सांगड नात्यांची, जपणूक प्रेमाची... दिवाळी पाडव्याच्या दिवशी द्विगुणित होवो आनंद तुमच्या संसाराचा! दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
    • दारात रांगोळी, दारी पणत्यांची आरास... आजचा दिवस खास, आरोग्याचा आणि आनंदाचा जावो हा दिवाळी पाडवा तुम्हाला मनापासून खास!
    • सोन्यासारख्या नात्याला, प्रेमाचा सुवास... पाडव्याच्या दिवशी लाभो तुम्हाला सुखाचा सहवास! पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
    • मंगलतेचे प्रतीक, समृद्धीची पहाट... दिवाळी पाडवा घेऊन येवो तुमच्या आयुष्यात सुखाची नवी लाट!

    दिवाळी पाडवा खास कोट्स् (Quotes)

    • "पति-पत्नीच्या पवित्र नात्याचा सण, प्रेमाचा आणि विश्वासाचा हा दिवाळी पाडवा."
    • "उजळले दीप, सजले घरदार... पाडव्याचा सण आणेल आयुष्यात प्रेमाचा बहर."
    • "नाती जपून ठेवूया, आनंद वाटून घेऊया... दिवाळी पाडव्याच्या या शुभदिनी सुख-समृद्धीची कामना करूया."
    • "आयुष्याची नवी सुरुवात, विश्वासाचा नवा धागा... दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नात्यात येवो अधिक गोडवा."

    हेही वाचा - Diwali Padwa 2026: आज दिवाळी पाडवा; जाणून घ्या पतीचे औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त