जेएनएन, नवी दिल्ली: दिवाळी पर्वाला सुरूवात झाली असून 8 नोव्हेंबर रोजी अवघ्या देशभरात लक्ष्मीपूजन पार पडलं. ज्यानंतर दिवाळीतील अत्यंत मंगल आणि आनंदाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा असतो… 2026 मध्ये दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पत्नी पतीला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते. व्यापारी वर्गासाठीही हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

बलिप्रतिपदा 2026 मुहूर्त...(Diwali Padwa 2026 Muhurt)

पंचांगानुसार कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा सूर्योदय 10 नोव्हेंबर रोजी होत असल्याने या दिवशी पाडवा साजरा केला जाईल. 

प्रतिपदा तिथी 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी सुरू होऊन 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता संपते.

पतीचे औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त...

धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला औक्षण करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते.

    10 नोव्हेंबर 2026 च्या पंचांगानुसार शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे :

    • - शुभ चौघडिया मुहूर्त : सकाळी 10 वाजून 57 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत.
    • - अभिजित मुहूर्त : सकाळी 11 वाजून 59 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत.
    • - औक्षणासाठी योग्य वेळ : सकाळी 11 वाजून 59 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत. हा दोन्ही मुहूर्तांचा समान कालावधी आहे.

    पंचांगानुसार, प्रतिपदा तिथी दुपारी 2 वाजेपर्यंत असल्याने सकाळच्या वेळेत औक्षण करण्यास प्राधान्य देता येईल. मात्र कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि स्थानिक पुरोहितांच्या सल्ल्यानुसार मुहूर्त निश्चित करावा. इतर शहरांमध्ये स्थानिक सूर्योदयामुळे मुहूर्ताच्या वेळेत फरक असू शकतो.

    कसे करावे पतीचे औक्षण?

    धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळी पाडव्याच्या दिवशी घराची स्वच्छता करून दारात सुंदर रांगोळी काढली जाते. 

    • देवघरात दिवा लावून भगवान विष्णू आणि बळीराजाचे स्मरण केले जाते. 
    • त्यानंतर पत्नी पाटावर किंवा आसनावर पतीला बसवून त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते. 
    • औक्षणाच्या ताटात निरांजन, अक्षता, हळद-कुंकू, फुले आणि मिठाई ठेवली जाते. 
    • निरांजनाने पतीला ओवाळून त्याला अक्षता लावल्या जातात. 
    • त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना केली जाते. 
    • औक्षणानंतर पती पत्नीला भेटवस्तू देतो. 
    • घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेतले जातात.

    हेही वाचा - Diwali Snacks: दिवाळीचा फराळ लवकर खराब होतोय? या 5 टिप्स वापरा आणि पदार्थ ठेवा अधिक दिवस ताजे