जेएनएन, मुंबई. संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत. श्रींच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कलाकारही श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. 

श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते. कुठे 11 दिवस, कुठे 9 दिवस, 7 दिवस, 5 दिवस तर कुठे दिड दिवसांसाठी श्री स्थापना होते. या दिवसांमध्ये सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. आद्यदेवता गणेश यांची महाराष्ट्रात घरोघरी स्थापना होत असते. या निमित्ताने भाविक हे कलाकारांकडून गणेशाची मूर्ती घेत असतात. भाविकांना मूर्ती योग्य वेळेत आणि सुंदर मिळावी, यासाठी कलाकारही जीव लावून श्रींची मूर्ती बनवत असतात. आता कलाकडून श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे.

गणेशोत्सव 2025 कधी सुरु होणार - 

27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्दशीपासून सुरू होणारा हा गणेशोत्सव सण 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपेल.

फोटो क्रेडिट - एजन्सी

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा 

    काही दिवसांनी शहरात साजरा होणारा गणेशोत्सव सामाजिक जबाबदारी ओळखून तसेच प्रदूषणाचा विळखा दूर राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत केले.

    अनंत चतुर्थी यंदा सुट्टी नाही?

    यंदा मुंबईत दहीहंडी आणि अनंत चतुर्थी ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जनच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे शासनाकडून एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर करण्यात आले आहे.