जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray Interview : मराठीच्या मुद्द्यावर राज व उद्धव हे ठाकरे बंधू २० वर्षानंतर एकत्र आले आहेत. त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वारे वाहू असून मुंबई पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची (Raj Thackeray)  मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी सामनासाठी घेतलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीची राज्यात चर्चा होत आहे. या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध झाला असून यात उद्धव ठाकरे म्हणतात की, राज आता आपल्यासोबत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे अनेक गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.

मराठी भाषाच्या समर्थनात ठाकरे बंधु एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मात्र आगामी स्थानीक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र राहून लढणार काय, यावर ठामपणे कोणीच काही बोलत नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत सकारात्मक एक पाऊल पुढे केले आहे. सामनाच्या मुलाखतमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत मोठे विधान केले आहे. आगामी निवडणुकीत युती होणार काय? असा सवाल करताच उद्धव ठाकरे यांनी “राज आता सोबत आहे” असे म्हणत सकारात्मक संकेत दिले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी युतीबाबत कुठलेही भाष्य केले नाही. राज ठाकरे कडून युतीबाबत कुठलेही भाष्य न करता निवडणुका जाहीर झाल्यावर पाहू असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा -Shashikant Shinde : शरद पवारांनी भाकरी फिरवली..! पक्षाचा नवा शिलेदार शशिकांत शिंदे यांना करावा लागणार ‘या’ आव्हानांचा सामना

काय म्हणाले बाळा नांदगावकर आणि आदित्य ठाकरे!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आतापर्यंत आम्ही एकटेच निवडणूक लढवली आहे, वेळ आली तर पुन्हा एकटे लढू. युतीबाबत पक्षात कुठलाही निर्णय झाला नाही. तर निवडणूक लागल्यावर पाहू असे म्हणत संभाव्य युतीबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे.

युतीबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया -

    ५ जुलै रोजी आम्ही मराठी भाषासाठी एकत्र आलो होतो. तिसऱ्या भाषेला आमचा विरोध कायम आहे. आमच्या बाजूने महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आम्ही करणार आहे. आम्ही केवळ राजकारण पाहत नाही, महाराष्ट्राचं हित पाहतो असे म्हणत युतीवर बोलने आदित्य ठाकरे यांनी टाळले.