Viral Video : महाराष्ट्रात भाषावादाने संघर्षाची स्थिती असताना सोशल मीडियावर एका फॉरेनर पत्नीसाठी महाराष्ट्रीयन पतीने मन जिंकण्यासाठी त्याच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एकीकडे काही झाले तरी मराठी बोलणार नाही, असा हट्ट करणारा मुंबईतील उत्तर भारतीय आणि दुसरी सातासमुद्रापार राहणाऱ्या महिलेने दोन संस्कृती एकत्र आणण्यासाठी पतीची भाषा शिकण्याची केलेला प्रयत्न सर्व काही सांगणारा आहे. सध्या सोसळ मीडियावर अनेक व्हिडिओ व रील्स व्हायरल होत असतात मात्र या जोडप्यांचा व्हिडिओ पाहून प्रत्येक मराठी मनाला प्रसन्न वाटेल व चेहऱ्यावर नकळत हास्य उमटेल. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरूवातीला अमेरिकन महिला आपल्या महाराष्ट्रीयन पतीला मराठी भाषेत बोलून सरप्राइज द्याचे ठरवते. सुरुवातील ती म्हणते की, मी फार काही चांगली मराठी बोलू शकणार नाही, मात्र चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती पतीला गुड मॉर्निंग न म्हणता शुभ सकाळ, कसा आहेस? म्हणते. हे ऐकून पती शॉक होतो. त्यानंतर ती पतीला विचारते रात्रीच्या जेवणाला काय बनवणार? त्यावर पती म्हणतो चिकन बनवणार आहे. चिकनची टेस्ट घेतल्यानंतर ती पतीला मराठीतून धन्यवाद, असे म्हणते.

या व्हिडिओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी महिलेच्या मराठी बोलण्याचे व जोडप्याचे कौतुक केले आहे. महिला जेव्हा धन्यवाद म्हणते तेव्हा हसू आले असे एका युजरने म्हटले आहे तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भारताकडून व खास करून महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला खुप धन्यवाद.. आणखी एका यूजरने लिहिले, "पुढच्या वेळी, "अहो ऐका" म्हणा, त्यानंतर पतीच्या चेहऱ्यावरील भाव पाहा, असे म्हटले आहे.

महिलेने "भाषेमध्ये मी परिपूर्ण नाही पण मी प्रयत्न करत आहे. असे व्हिडिओचे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ मूळचे महाराष्ट्राचे असणारे अनिकेत कर्णे व त्यांची अमेरिकन पत्नी कॅन्डेस कर्णे यांचा आहे. या व्हिडिओमध्ये कॅन्डेस कर्णे अनिकेतसोबत मराठीत संवाद साधताना दिसते. या व्हिडिओवर नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.