कोलकाता: बंगालमध्ये काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, पक्षांतराचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे, सेलिब्रिटी त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर बंगाली चित्रपट अभिनेत्री पर्णो मित्रा शुक्रवारी भाजप सोडून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाली.

बंगालच्या अर्थमंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत दुपारी तृणमूल भवन येथे मित्रा यांनी पक्षाचा ध्वज हाती घेत तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अभिनेत्री पर्णो मित्रा म्हणाल्या की, भाजपमध्ये सामील होऊन तिने चूक केली होती.

ममता बॅनर्जी यांच्या विकासकामाने प्रभावित -
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन ती तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाली असा दावा तिने केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्री मित्रा भाजपमध्ये सामील झाली होती मात्र ती पक्षात सक्रियपणे कधीच दिसली नाही.