नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटूंबातील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.  येथे एका सावत्र वडिलांवर त्याच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिचेची आई पोलीस कॉन्स्टेबल असून तिने  पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या आई आणि सावत्र वडिलांसोबत खलीलाबाद कोतवाली परिसरात एका भाड्याच्या घरात राहते. ती  एका खाजगी शाळेत पाचवीच्या वर्गात शिकते. मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी सावत्र वडिलाने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले.  घटनेनंतर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. मात्र तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती ऐकून आईला धक्का बसला, पण भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी तिने जबाबदारी आणि कर्तव्य दाखवले. तिने तात्काळ खलीलाबाद पोलिस ठाणे गाठून लेखी तक्रार दाखल केली. तिने  आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

आरोपीला अटक -

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले.  पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिला आवश्यक समुपदेशन आणि सुरक्षा देखील पुरविली जात आहे.

जबाबांच्या आधारे गुन्हा दाखल-

    या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून कारवाई केली आहे. पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल.