Union Budget 2026 Highlights: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला नववा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गाला मोठा दिलासा देत कररचनेत कोणताही बदल केला नाही.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असल्याची मोठी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मध्यमवर्ग आणि नोकरदारांची अपेक्षा होती की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयकरातील करसवलत वाढवून मिळेल, मात्र सीतारमन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.
- 2026-02-01 13:39:25
सेन्सेक्स, निफ्टी 50 कोसळले
दुपारच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 2,370.36 अंकांनी किंवा 2.88 टक्क्यांनी घसरून 80,000 अंकांच्या खाली 79,899.42 वर आला. एनएसई निफ्टी 50 हा 748.9 अंकांनी म्हणजेच 2.95 टक्क्यांनी घसरून 24,571.75 वर बंद झाला. सविस्तर वाचा - - 2026-02-01 13:36:41
Income Tax Slabs Budget 2026: आयकर स्लॅब जैसे थे;
Income Tax Slabs Budget 2026: आयकर स्लॅब जैसे थे; सविस्तर वाचा - - 2026-02-01 13:09:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
Budget Highlights 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा - - 2026-02-01 13:08:31
Budget 2026 Highlights : कोणत्या गोष्टी महाग व स्वस्त होणार
Budget Highlights 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत. आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पाचा सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होणार आहे. ते जाणून घेऊया… सविस्तर वाचा - - 2026-02-01 13:08:00
1 एप्रिल पासून नवा प्राप्तीकर कायदा लागू होणार
Budget Highlights 2026: 1 एप्रिल पासून नवा प्राप्तीकर कायदा लागू केला जाणार आहे अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसंच प्राप्तीकर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाईल असंही सीतारमण यांनी म्हटलंं आहे. सविस्तर वाचा - - 2026-02-01 12:12:00
budget highlights: 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, 3 आयुर्वेद एम्स
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की देशात तीन नवीन आयुर्वेद एम्स उघडले जातील. पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे देखील स्थापन केली जातील. - 2026-02-01 12:10:01
Budget 2026 highlights : 'या' पाच राज्यांना समर्पित रेअर अर्थ कॉरिडॉरची घोषणा
Budget 2026: 'या' पाच राज्यांना समर्पित रेअर अर्थ कॉरिडॉरची घोषणा सविस्तर वाचा - 2026-02-01 12:09:09
आयकर फॉर्म सोपा केला जाईल - अर्थमंत्री
आयकर फॉर्म सोपा केला जाईल . 1 एप्रिलपासून नवीन आयकर फॉर्म उपलब्ध होईल. परदेश प्रवासावर टीडीएस 2% असेल. - 2026-02-01 11:47:39
budget highlights 2026: देशात तीन नवीन आयुर्वेद एम्स उघडणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की देशात तीन नवीन आयुर्वेद एम्स उघडतील. याव्यतिरिक्त, पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे देखील स्थापन केली जातील. - 2026-02-01 11:46:53
budget 2026: बायो फार्मा शक्ती प्रोजक्ट साठी 10000 कोटी रुपयांची घोषणा
budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील 5 वर्षांसाठी 10000 कोटी रुपयांच्या वाटपासह बायो फार्मा शक्ती कार्यक्रमांतर्गत भारतातील बायोफार्मा क्षेत्राला चालना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सविस्तर वाचा - 2026-02-01 11:31:00
उत्पादन क्षेत्रासह 'या' सहा क्षेत्रांवर फोकस
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्पादन क्षेत्र, धोरणात्मक आणि सीमावर्ती क्षेत्रे, आरोग्यसेवा आणि प्रगत तंत्रज्ञान यासह सहा क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप प्रस्तावित केला आहे. - 2026-02-01 11:27:50
महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्यात दोन रेल्वे केरिडॉर मार्गांची घोषणा अर्थसंकल्पात सीतारामन यांनी केली. मुंबई-पुणे आणि पुणे- हैदराबाद या रेल्वे केरिडॉर मार्गाची घोषणा त्यांनी केली. - 2026-02-01 11:24:48
सरकारकडे तीन कर्तव्ये आणि सहा लक्ष केंद्रित क्षेत्रे - अर्थमंत्री
Union Budget 2026 LIVE: विकसित भारतासाठी अर्थमंत्र्यांनी तीन कर्तव्ये आणि सहा लक्ष केंद्रित क्षेत्रे असतील, असं अर्थमंत्री निर्मला म्हणाला. - 2026-02-01 11:22:44
देशात तीन समर्पित रासायनिक क्लस्टर स्थापन केले जातील - अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, देशात तीन समर्पित रासायनिक क्लस्टर स्थापन केले जातील. - 2026-02-01 11:18:39
budget 2026 live: पाच राज्यांमध्ये दुर्मिळ खनिजांसाठी समर्पित कॉरिडॉर स्थापन केला जाईल
budget 2026 live: अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, पाच राज्यांमध्ये दुर्मिळ खनिजांसाठी समर्पित कॉरिडॉर स्थापन केला जाईल. इंडिया सेमीकंडक्टर मिशनसाठी पुरवठा साखळी आणि उपकरणे आणि साहित्य उत्पादन मजबूत करण्यासाठी ISM 2.0 सुरू केले जाईल. - 2026-02-01 11:13:11
जागतिक अनिश्चितता असूनही मजबूत अर्थसंकल्पावर लक्ष - अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की जागतिक अनिश्चितता असूनही मजबूत अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. - 2026-02-01 11:01:19
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु पाहा Live
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु - - 2026-02-01 10:59:20
Budget 2026: हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प असेल – किरेन रिजिजू
"हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प असेल," असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सांगितले. - 2026-02-01 10:46:03
2026 च्या अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
2026 च्या अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. - 2026-02-01 10:43:16
Budget 2026 Live: 2026 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन
2026 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन - 2026-02-01 10:40:34
140 कोटी नागरिक आणि मोठ्या आशा, अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय थोड्याच वेळात भाषण सुरू
140 कोटी नागरिक आणि मोठ्या आशा, अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय थोड्याच वेळात भाषण सुरू - 2026-02-01 10:37:11
Gold Silver Price Today: सोने चांदीचे दर कोसळले
Gold Silver Price Today: शुक्रवार, 30 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदीचे दर 4 लाखांवरून 2,91,000 रुपये प्रति किलो झाले. गेल्या वर्षीपासून चांदीच्या किमती झपाट्याने वाढत होत्या, त्यामुळे ही मोठी घसरण समजण्यासारखी होती. सोन्याच्या किमतीतही लक्षणीय घट झाली, ती प्रति 10 ग्रॅम 1.49 लाख रुपये झाली. सविस्तर वाचा - - 2026-02-01 10:16:35
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी निर्मला सीतारामन यांचे तोंड गोड केलं
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी निर्मला सीतारामन यांचे तोंड गोड केलं.
- 2026-02-01 10:05:47
Budget 2026 LIVE Updates: पीएम संसदेत दाखल
budget live: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी संसदेत दाखल झाले. - 2026-02-01 10:02:58
रिअल इस्टेट शेअर्समध्ये घसरण
Budget 2026 LIVE Updates: अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त एक तास शिल्लक असताना, रिअल इस्टेट शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पात सरकारची महत्त्वपूर्ण मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. - 2026-02-01 09:59:15
अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत पोहोचल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी त्यांच्या टीमसह संसदेत पोहोचल्या.दिल्ली: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण और वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी अपनी टीम के साथ केंद्रीय बजट 2026-27 से पहले संसद पहुंचे। pic.twitter.com/RbvS3FdEu4
— IANS Hindi (@IANSKhabar) February 1, 2026 - 2026-02-01 09:55:10
Union Budget 2026: अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण किती वाजता सुरू होईल?
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे भाषण 1 फेब्रुवारी रोजी संसद भवनात सकाळी 11 वाजता वेळेवर सुरू होईल. यावर्षीचे सादरीकरण रविवारी होत असले तरी, ही वेळ परंपरेनुसार आहे.
