डिजिटल डेस्क, नवी दिल्ली: नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहे की, जलदगती खटला चालवून दोषींना कठोरतम शिक्षा मिळावी यासाठी पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी फास्ट-ट्रॅक कोर्टात केली जाईल. 

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, "तुम्ही आमच्या तरुणांच्या भविष्याला सर्वात मोठे नुकसान पोहोचवले आहे. तुम्ही केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणे ताब्यात घेऊन नष्ट होऊ दिले नाही, तर त्याला प्रोत्साहनही दिले - आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचे संरक्षणही केले."

राहुल गांधी यांनी पुढे लिहिले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. 

  • धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून काढून टाका.
  • विद्यार्थ्यांची माफी मागा.
  • विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा.

राहुल गांधी यांची पोस्ट 

जलदगती न्यायालयात सुनावणी - पीएम मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणावर मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी X या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी कोणत्याही पेपरफुटीच्या घटनांमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा आणि दोषी आढळलेल्यांना त्वरित व कठोर शिक्षा व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी जलदगती न्यायालयात याची सुनावणी होईल, अशी माहिती दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट

    “देशातील युवकांचे कल्याण आणि भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही पेपरफुटीच्या घटनांमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा आणि दोषी आढळलेल्यांना त्वरित व कठोर शिक्षा व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी जलदगती न्यायालयात याची सुनावणी होईल. आवश्यक ती कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” अशी पोस्ट पीएम मोदी X या सोशल मीडियावर केली आहे.