डिजिटल डेस्क, नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत तीन आमदारांनी पक्ष सोडला आहे. बंडखोर आमदारांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. 

सोमवारी दिल्लीत आपचे बंडखोर नेते कुंवर विजय प्रताप सिंग, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोडामाजरा भाजपामध्ये सामील झाले.

'...त्यांचे पंख छाटले'

 भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरमीत सिंग पठाणमाजरा म्हणाले, "जेव्हा आम आदमी पक्ष (AAP) पहिल्यांदा पंजाबमध्ये आला, तेव्हा त्यांनी एक अत्यंत प्रभावी दृष्टिकोन मांडला होता. याच विचारांच्या जोरावर आम आदमी पक्ष इतक्या मोठ्या राजकीय व्यवस्थेत स्वतःचे सरकार स्थापन करू शकला. मात्र, काळानुसार ज्यांनी आवाज उठवला, ज्यांनी पंजाबच्या हितासाठी पुढाकार घेतला, त्यांचे पंख छाटले जाऊ लागले... आज पंजाबला अनेकदा 'उडता पंजाब' असे संबोधले जाते, परंतु आमची इच्छा आहे की त्याचे रूपांतर 'उभरत्या पंजाब'मध्ये व्हावे. 'आप'ने पंजाबला एका दलदलीत ढकलले आहे. आम आदमी पक्षाने इतर कोणत्याही सरकारच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज घेतले आहे, ज्यामुळे पंजाबची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे..."

हेही वाचा - Maharashtra Rain: दुष्काळात दिलासा, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस