मुंबई. Doctor Sejal Pawar Controversial Comment: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीचा मुद्दा तापलेला असताना, डॉक्टर सेजल पवार हिच्या वक्तव्याचा समोर आलेल्या व्हिडीओमुळे निर्माण झालेला वाद अधिक चिघळला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सेजल पवार (Sejal Pawar) हिने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून तिला जोरदार ट्रोल केले जात असून तिच्याविरोधात आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यातच या प्रकरणात दोन क्रिकेटपटूंची एंट्री झाली असून त्यांना सेजल डेट करत होती, हे समोर आले आहे. सोशल मीडियावर सेजरविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून तिच्या खासगी आयुष्याच्या बाबीही समोर आल्या आहेत. काही खासगी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात सेजलचे दोन भारतीय क्रिकेटपटूंसोबत अफेअर असल्याचे म्हटले आहे.
सेजलविरोधात पोलिसांत गुन्हा
मुंबईतील प्रसिद्ध केईएम (KEM) रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणादरम्यानचा एक किस्सा लाईव्ह कार्यक्रमात सांगितला आणि नव्या वादाला तोंड फोडले. शवविच्छेदनाच्या (Post-mortem) वेळी ‘ॲनाटॉमी लॅब’मध्ये ती आणि तिची मैत्रीण मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकारावर बोलायच्या त्यांची आपापसात तुलना करायच्या, असे वादग्रस्त वक्तव्य डॉ. सेजल हिने केले. तिला कार्यक्रमाचा होस्ट व कॉमेडियन प्रणित मोरे यानेही हसून दाद दिली.
याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह नेटीझन्समध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृतदेहाच्या आणि वैद्यकीय व्यवसायाच्या अवमानाबद्दल तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या वाढत्या दबावानंतर, अखेर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सेजल पवार हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांतर्गत अधिकृत गुन्हा दाखल केला आहे.
सेजलचे दोन क्रिकेटपटूंसोबत अफेअर -
डॉक्टर सेजल पवारशी संबंधित कथित चॅट्स आणि जुने स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन भारतीय क्रिकेटपटूंची नावे समोर आली आहेत. हे दोन भारतीय क्रिकेटपटू म्हणजे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) आहेत. ‘रेडिट’ (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेजलच्या फ्रेंड्सचे कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि ओडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.
तिने लोकांचा टिश्यू पेपरसारखा वापर केला -
सेजल हिने क्रिकेटपटू पृथ्वी आणि आयुष बदोनी यांना डेट केलं आणि त्यानंतर दोघांना चिट केलं… असा दावा चॅटमध्ये करण्यात आला आहे. चॅटमध्ये दोघांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. ‘सेजलने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा दावा चॅट्समध्ये केला आहे. ती लोकांचा वापर टिश्यू पेपरसारखा करते, असं देखील चॅटमध्ये दिसत आहे.
सेजलला नीट परीक्षेत किती मार्क -
कॉमेडी शोमध्ये मेल डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टच्या साइजवर टिप्पणी करून चर्चेत आलेली एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवारला मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी मध्ये 720 पैकी 406 गुण होते. तिने डॉक्टर बनण्यासाठी मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटलमध्ये वर्ष 2022 मध्ये एमबीबीएस कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. आरक्षित कोट्यातून तिने प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर तिला 12वी परीक्षेत इंग्रजी विषयात 100 पैकी 87 मार्क्स होते. त्याचबरोबर पीसीबी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये 300 पैकी 190 गुण होते. म्हणजेच पीसीबी ग्रुपमध्ये तिला 63 टक्के मार्क्स होते. सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटल एक सरकारी मेडिकल कॉलेज आहे. हे मुंबई महापालिकेकडून चालवले जाते. सामान्यपणे या मेडिकल कॉलेजमध्ये जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना नीट यूजी परीक्षेत 600 हून अधिक गुण असल्यासच प्रवेश मिळतो.
