नवी दिल्ली: Narendra Modi In Church:  पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळच्या सकाळच्या प्रार्थनेत दिल्ली आणि उत्तर भारतातील मोठ्या संख्येने ख्रिश्चन लोकांसोबत सहभागी झाले.

प्रार्थना सभेत प्रार्थना, कॅरोल, भजन आणि दिल्लीचे बिशप राईट रेव्हरंड पॉल स्वरूप यांनी पंतप्रधानांसाठी केलेली विशेष प्रार्थना समाविष्ट होती.

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान मोदींनी X वरील एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले, "दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे ख्रिसमसच्या सकाळच्या सेवेत भाग घेतला. या सेवेने प्रेम, शांती आणि करुणेचा शाश्वत संदेश प्रतिबिंबित केला. ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. "शांती, करुणा आणि आशेने भरलेल्या नाताळाच्या सर्वांना शुभेच्छा. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी आपल्या समाजात सुसंवाद मजबूत करोत, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.

संपूर्ण दिल्लीतील लोक प्रभु येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यासाठी आणि नाताळ साजरा करण्यासाठी या चर्चमध्ये येतात. पंतप्रधान मोदींनी याआधीही या चर्चमध्ये भेट दिली आहे.