जेएनएन, गुवाहाटी: IAF Plane Crash in Jorhat: आसाममध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. जोरहाट विमानतळावर उतरत असताना भारतीय हवाई दलाचे 'अँटोनोव्ह एएन-32' (Antonov AN-32) हे मालवाहू विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागल्याची माहिती आहे.

भारतीय हवाई दलाच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू
आसाममधील जोरहाट हवाई तळावर 'एएन-32' (AN-32) या मालवाहू विमानाला झालेल्या अपघातात भारतीय हवाई दलाच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
#UPDATE | Five Indian Air Force personnel have lost their lives in the air crash involving the AN-32 transport aircraft at the Jorhat air base in Assam. The co-pilot has survived and is being provided treatment. A court of inquiry has been ordered by the Indian Air Force to… https://t.co/JYX7IxmEUo pic.twitter.com/j63CEWtvQ0
— ANI (@ANI) June 13, 2026
घटनास्थळी बचावकार्य आणि तपास सुरू
आसाममधील जोरहाट येथील हवाई दल तळावर लँडिंग करताना लष्करी विमानाचा अपघात झाला. हे विमान 'एएन-31' (AN-31) प्रकारचे मालवाहू विमान होते, ज्याचा वापर साहित्याची ने-आण करण्यासाठी केला जातो. हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य आणि तपास सुरू असून, अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, या घटनेत जीवितहानी किंवा कुणी जखमी झाल्याबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत किंवा स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

चौकशी सुरू
भारतीय हवाई दलाने (IAF) या अपघाताला दुजोरा दिला असून, घटनास्थळावरील परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जात असल्याचे आणि नवीन माहिती समोर येताच पुढील तपशील दिले जातील असे स्पष्ट केले आहे. हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू केली आहे. पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

