जेएनएन, प्रयागराज. Mahakumbh Stampede: महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज इथं संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, 30 पैकी 25मृतांची ओळख पटली आहे, अशी माहिती डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.

30 भाविकांचा मृत्यू

"ब्रह्म मुहूर्ताच्या आधी, पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान, आखाडा मार्गावर मोठी गर्दी जमली. या गर्दीमुळे, दुसऱ्या बाजूला असलेले बॅरिकेड्स तुटले आणि गर्दी दुसऱ्या बाजूला ब्रह्म मुहूर्ताच्या पवित्र स्नानासाठी वाट पाहणाऱ्या भाविकांना त्यांनी तुडवले. यात सुमारे 90 भाविक जखमी झाले, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले परंतु दुर्दैवाने, या घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली. (Mahakumbh Stampede News)

कर्नाटकातील 4 भाविक

30 भाविक मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे आणि उर्वरित लोकांची ओळख पटलेली नाही. यामध्ये कर्नाटकातील 4, आसाममधील 1, गुजरातमधील 1 जणांचा समावेश आहे. 36 जणांवर स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत, असं महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले.

    आखाड्यांचे अमृत स्नान सुरक्षितपणे संपन्न

    सध्या परिस्थिती सामान्य आहे. भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व महामंडलेश्वर, संत, आखाड्यांना काही विलंबाने पवित्र स्नान करण्याची विनंती केली आहे. सर्व आखाड्यांचे अमृत स्नान सुरक्षितपणे संपन्न झाले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

    हेही वाचा - Mahakumbh 2025 Fire: महाकुंभच्या सेक्टर 5 मध्ये भीषण आग, अनेक तंबू जळून खाक; अग्निशमन दल आणि पोलिसांनी आग आणली आटोक्यात