श्रीनगर. Jammu and Kashmir Landslide : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे श्रीनगर-बारामुल्ला-उरी राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-१) भूस्खलन झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंगरावरून ढिगारा पडल्याने वाहतूक दोन्ही बाजुन टप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, डोंगरावरून दगड पडू लागले, महामार्गावरील वाहनांतून लोक खाली उतरून पळू लागले, यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
VIDEO | J&K: A landslide at the Baramulla stretch of the Srinagar–Baramulla–Uri National Highway (NH-1) blocks the highway, disrupting vehicular movement.#JammuAndKashmir #Baramulla #Landslide
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2026
(Source – Third party)
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/wEwmXIcHqt
उरी जवळील राष्ट्रीय महामार्गावरील एक डोंगर अचानक घसरू लागला, ज्यामुळे ढिगारा महामार्गावर पडला. लोकांना काही समजण्यापूर्वीच ते त्यांच्या वाहनांमधून बाहेर पडले आणि पळू लागले. अपघाताच्या वेळी घटनास्थळी अनेक वाहने उपस्थित होती. सुदैवाने, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. सध्या, वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
