जेएनएन, मुंबई. Shivraj Patil chakurkar Demise: माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांचे शुक्रवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
वृत्तानुसार, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे लातूर येथे निधन झाले. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत शिवराज पाटील यांनी लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली. पाटील यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला.
राजकारणातील सहा दशकांचा प्रवास
शिवराज पाटील चाकूरकर गुणवत्तापूर्ण, स्वच्छ आणि अभ्यासू राजकारणी होते. ते देशातील सर्वाधिक आदराचे आणि प्रामाणिक प्रतिमेचे नेते म्हणून गणले जात होते.
राजकीय प्रवास
- काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या पदांवर काम
- राज्य आणि केंद्रात विविध मंत्रीपदे
- भारताचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी
- लोकसभेचे माजी अध्यक्ष
- केंद्रीय मंत्री म्हणून प्रभावी कार्यकाळ,त्यांच्या कामकाजाची शैली शांत, संयमी आणि सखोल अभ्यासावर आधारित होती.
लातूरचे राजकारण घडवणारे नेतृत्व
लातूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद निर्माण करण्यात आणि अनेक पिढ्यांना राजकीय मार्गदर्शन देण्यात त्यांचे योगदान मोठे होते. स्वच्छ, निर्भेळ आणि विकासाभिमुख राजकारणाची परंपरा त्यांनी जपली.
सक्रिय राजकारणातून निवृत्ती
गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सक्रिय राजकीय जीवनातून पूर्णपणे निवृत्ती घेतली होती. त्यानंतरही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करत होते. पाटील यांच्या निधनाची बातमीने संपूर्ण लातूर हळहळ करत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते,राज्यातील सर्वपक्षीय नेते,सामाजिक संस्था,लातूरकर जनतेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी त्यांना “विनम्र, तर्कशुद्ध आणि घटनात्मक मूल्यांचे मार्गदर्शक नेते” म्हणून स्मरण केले आहे.
अंत्यसंस्काराची तयारी
कुटुंबीयांच्या माहितीप्रमाणे, अंत्यसंस्कार लातूरमध्येच करण्यात येणार आहेत. राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Bus Accident: आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बस दरीत कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
