नवी दिल्ली, Vice Presidential election : निवडणूक आयोगाकडून भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

उपराष्ट्रपतीपदाची अधिसूचना 7 ऑगस्ट रोजी जारी केली जाईल आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट असेल. निवडणुकीचे निकाल मतदानाच्या दिवशीच म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले जातील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, 21 ऑगस्ट ही उपराष्ट्रपती पदासाठी नामांकनाची शेवटची तारीख आहे. या पदासाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होईल आणि त्यानंतर देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळतील.

जर या निवडणुकीत विरोधी पक्षाने आपला उमेदवार उभा केला नाही तर उपराष्ट्रपतींची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान गुप्त असते. अशा परिस्थितीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 9 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करेल. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर, दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी 22 ऑगस्ट रोजी केली जाईल.

    25 ऑगस्ट ही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 9 सप्टेंबर रोजी संसद सदस्य उमेदवाराला मतदान करतील. मतदानाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत राज्यसभेचे 233 निवडून आलेले सदस्य, 12 नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे 543 सदस्य सहभागी होतील.

    22 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 रोजी संपणार होता. परंतु धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देण्याची घोषणा केली होती.