नवी दिल्ली. Bypoll Election Result: बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ, गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघ आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी 30 जुलै रोजी मतदान संपन्न झाले. मतदानानंतर, आज, 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी सुरू असून मतमोजणी केंद्रांवर मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
या तीन जागांपैकी, बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या जागा सर्वाधिक चर्चेत आहेत, ज्यांवर देशभरातील लोकांचे बारीक लक्ष आहे. दतियामध्ये काँग्रेस उमेदवार बाजी मारली आहे तर बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर आघाडीवर आहेत. दरम्यान, गुजरातच्या मांजलपूरमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला आहे.
Datia By Election Result 2026: दतियामध्ये काँग्रेसचा 6053 मतांनी विजय.
दतियामध्ये मतदानाच्या 15 व्या फेरीनंतर काँग्रेसने 6053 मतांनी विजय मिळवला आहे. 15 व्या फेरीपर्यंत काँग्रेसला एकूण 66750 मते मिळाली आहेत, तर भाजपला 60697 मते मिळाली आहेत.
Bankipur By Election Result: बांकीपूरमध्ये 27 व्या फेरीनंतर प्रशांत किशोर 16887 मतांनी आघाडीवर
बांकीपूरमधील मतमोजणीच्या 27 व्या फेरीनंतर, प्रशांत किशोर 16,887 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 55,780 मते मिळाली आहेत. भाजपचे नीरज सिन्हा 38,893 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर आरजेडीच्या उमेदवाराला 12,461 मते मिळाली आहेत.
Manjalpur By-Election Result: मांजलपूरमध्ये भाजपचा 30630 मतांनी बंपर विजय-
भाजपने मांजलपूर विधानसभा पोटनिवडणूक 30630 मतांच्या फरकाने जिंकली. भाजपचे उमेदवार सतीश पटेल यांना एकूण 55,481 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार भिकाभाई रबारी यांना 24,851 मते मिळाली. मांजलपूरमध्ये 'नोटा'ला 2,247 मते मिळाली.
