डिजिटल डेस्क, पाटणा. Bihar Bankipur By Election Result: बांकीपूर विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पाटण्यातील ए.एन. कॉलेज हे मतमोजणी केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले असून, तिथे सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण रीतीने पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पाटणा जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.  

Prashant Kishor Lead: प्रशांत किशोर 10436 मतांनी आघाडीवर

मतमोजणीच्या 18 व्या फेरीनंतर, प्रशांत किशोर 10436 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे नीरज सिन्हा 25277 मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत. प्रशांत किशोर यांना 35713 मते मिळाली. आरजेडीच्या उमेदवाराला 9316 मते मिळाली. 

केवळ अधिकृत पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात आहे, त्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि विशेष तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणुकीच्या निकालांवर केवळ स्थानिक मतदारांचेच नव्हे, तर संपूर्ण बिहारमधील राजकीय वर्तुळाचेही बारीक लक्ष आहे. बांकीपूरच्या जनतेने आपला नवा आमदार म्हणून कोणाला निवडले आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. 

    जन सुराजच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण

    बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांची आघाडी कायम राहिल्याने, पाटण्यातील जन सुराज कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून आनंद साजरा केला.