जागरण प्रतिनिधी, प्रयागराज. माजी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यात पोहचली आहे. तीनं संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे. येथे तिने संन्यासाची दीक्षा घेतली आणि किन्नर आखाड्यात तिला महामंडलेश्वर बनवण्यात आले आहे.
VIDEO | Prayagraj: Film actress Mamta Kulkarni to become Mahamandleshwar of Kinnar Akhara at Maha Kumbh.
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/J0lK8Z7fJ4
महामंडलेश्वर ही पदवी
ममता कुलकर्णी हीला किन्नर आखाड्याने अभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली आहे. यामुळे तिला आखाड्याची साध्वी म्हणून ओळखले जाईल. याआधी त्यांनी एक व्हिडिओ देखील जारी करून याबद्दल माहिती दिली. तिने सांगितले की साध्वी झाल्यानंतर ती संगम, काशी आणि अयोध्याला भेट देणार आहे.
हेही वाचा - फडणवीस सरकारनं केली बसच्या भाडेदरात वाढ, लाडक्या बहिणींची तिकिटातील 50 टक्के सूट योजना बंद होणार?
"किन्नर आखाडा ममता कुलकर्णी (माजी बॉलीवूड अभिनेत्री) यांना महामंडलेश्वर बनवणार आहे. तिचे नाव श्री यमाई ममता नंदगिरी असे ठेवण्यात आले आहे. मी येथे बोलत आहे त्याप्रमाणे, सर्व विधी सुरू आहेत. ती गेल्या दीड वर्षांपासून किन्नर आखाड्याच्या आणि माझ्या संपर्कात आहे, तिला हवे असल्यास कोणत्याही भक्ताचे पात्र साकारण्याची परवानगी आहे कारण आम्ही कोणालाही त्यांची कला सादर करण्यास मनाई करत नाही." अशी माहिती किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी दिली आहे.
#WATCH | Prayagraj | Acharya Mahamandleshwar of Kinnar Akhada, Laxmi Narayan says, "Kinnar akhada is going to make Mamta Kulkarni (former Bollywood actress) a Mahamandleshwar. She has been named as Shri Yamai Mamta Nandgiri. As I am talking here, all the rituals are underway. She… pic.twitter.com/gF25BlKcEh
— ANI (@ANI) January 24, 2025
हेही वाचा - Rain Alert in Maharashtra: कमी दाबाचा पट्टा सक्रिय, राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस, वाचा सविस्तर