जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. किमान तापमानमध्ये घट झाली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे पुढील 48 तासांत राज्यात मुंबईसह इतर भागात अवकाळी पावसाचा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात थंडी आणि अवकाळी पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून सकाळी थंडी आहे. पुढील 48 तास राज्यात थंडी आणि अवकाळी पावसाचे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय

समुद्र किनाऱ्यावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. मध्य प्रदेशासह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर उत्तरेकडून सततची शीतलहरींचा मारा सुरूच आहे. पश्चिमी थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे.

    मुंबईत पुन्हा थंडी ! 

    गेल्या काही दिवसपासून मुंबईतील तापमानात चढ – उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबईत गारठा वाढला आहे. तर दिवसाचा तापमानात मात्र घाट झाली नाही. उद्या आणि रविवारी मुंबईतील कमाल तापमान 32 ते 33 अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.