नवी दिल्ली. Aviva Baig Profile : गांधी कुटुंबात बऱ्याच काळानंतर लग्नाची सनई वाजणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्रा याने त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अवीवा बेग (Aviva Baig)  हिच्याशी लग्न करणार आहे. दोघे सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता एका नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत.

प्रियंका गांधीं यांचा मुलगा रेहान वाड्रा राजकारणात सक्रीय नाही. त्याचबरोबर त्याने कधीही लाइमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला नाही. रेहान हा व्यवसायाने छायाचित्रकार आहे. तथापि, रेहानच्या साखरपुड्याची बातमी ऐकल्यानंतर, सर्वांना त्याची मंगेतर, अवीवाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अविवाचे दिल्लीशी कनेक्शन

अवीवा बेग हिचे कुटुंब मूळचे दिल्लीचे आहे आणि ते वाड्रा कुटुंबाच्या जवळचे मानले जाते. अवीवा यांनी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतले असून त्यानंतर तिने ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन्स आणि जर्नलिझममध्ये पदवी मिळवली.

अवीवा बेगवर एक नजर-

  • रेहानप्रमाणेच, अवीवा बेग देखील एक छायाचित्रकार आणि निर्माती आहे.
  • तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोर्टल्ससाठी छायाचित्रण केले आहे.
  • अवीवा 'इंडिया आर्ट फेअर', 'द इल्युसरी वर्ल्ड' यासह अनेक प्रदर्शनांचा भाग राहिली आहे.
  • अवीवा तिच्या छायाचित्रणातून अनेक सामाजिक मुद्देही मांडत असते.
  • अवीवा बेग ही राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे.
  • अवीवाला निसर्गातही खूप रस आहे, ती घनदाट जंगलांपासून ते उंच पर्वत, समुद्रकिनारे आणि वाळवंटांपर्यंत सर्व काही आपल्या कॅमेऱ्याने टिपत असते.

रेहान वाड्रा कोण आहे?

    रेहान वाड्रा हा व्यवसायाने एक व्हर्च्युअल आर्टिस्ट आहे, तो वयाच्या 10 व्या वर्षापासून फोटो काढत आहे. रेहान हा एक व्यावसायिक छायाचित्रकार तसेच वन्यजीव छायाचित्रकार आहे. 2021 मध्ये, त्याने नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे "डार्क परसेप्शन" च्या माध्यमातून सोलो प्रदर्शनात पदार्पण केले.