नवी दिल्ली: Assembly Election Results 2026 Live: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे, या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल आणि कोणाचा पराभव होईल, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी, तर आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका झाल्या.

पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस, भाजप, सीपीआयएम आणि काँग्रेस यांच्यात आहे. तामिळनाडूमध्ये मुख्य लढत डीएमके आघाडी, AIADMK आघाडी, टीव्हीके आणि एनटीके यांच्यात आहे. केरळमध्ये मुख्य लढत LDF, UDF आणि NDA  यांच्यात आहे. आसाममध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. पुदुचेरीमध्ये मुख्य लढत एनडीए आणि काँग्रेस आघाडी यांच्यात आहे.

निवडणुकीतील प्रमुख चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारी, मोहम्मद सलीम, एम.के.  स्टॅलिन, उदय निधी स्टॅलिन, पिनाराई विजयन, व्ही.डी. सतीसन, राजीव चंद्रशेखर, हिमंता बिस्वा सरमा, गौरव गोगोई, एन. रंगास्वामी आणि व्ही. वैथिलिंगम यांचा समावेश आहे. सर्व पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम सुरू केली असून या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली आहे. अधिक माहितीसाठी लाईव्ह ब्लॉग वाचा.

  • 2026-05-04 19:44:00

    west Bengal Assembly Election 2026: आज बंगाल भयमुक्त झाला आहे - नरेंद्र मोदी

    मोदी म्हणाले आसाममध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार, आज बंगालच्या जनतेने भाजपला काम करण्याची संधी दिली आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. हा विजय तमाम भाजप कार्यकर्त्यांना समर्पित आहे, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. बंगाल व केरळमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत.
  • 2026-05-04 19:30:00

    PM Narendra Modi: आज केवळ लोकशाही जिंकली नाही तर संविधान, संविधानिक संस्था यांचा विजय - मोदी

    मोदी म्हणाले, आसाममध्ये रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या भाजप-एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या दशकात आपला पक्ष आणि युती ज्या पद्धतीने विस्तारली आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आपला सकारात्मक अजेंडा आसाममधील जनतेच्या मनापर्यंत पोहोचला आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे. नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन -
  • 2026-05-04 19:21:00

    2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम लक्षात राहतील -मोदी

    पीएम मोदींनी बीजेपीच्या विजयावर सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर लिहिले की, '2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम लक्षात राहतील. जनतेच्या शक्तीचा विजय झाला आहे आणि BJP च्या सुशासन राजनीती यशस्वी झाली आहे. मी पश्चिम बंगालच्या प्रत्येक नागरिकासमोर नतमस्तक आहे. पंतप्रधानांनी पुढे लिहिले 'जनतेने BJP ला मोठा जनादेश दिला आहे मी त्यांना विश्वास देतो की, आमची पार्टी पश्चिम बंगालचे सपने व महत्वकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही असे सरकार देऊ जे समाजाच्या सर्व वर्गाला संधी व सन्मान निश्चित करेल.
  • 2026-05-04 04:45:00

    ममता बनर्जींच्या घराबाहेर जय श्री रामचे नारे, राज्य सचिवालयाला छावणीचे रुप -

    कोलकातामध्ये ममता बनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' चे नारे लावले. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये भाजपला मोठा विजय मिळत असल्याचे दिसताच राज्यातील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सचिवालय ‘नवान्न’ सह अनेक प्रमुख सरकारी कार्यालयांबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात केल्याने याला छावणीचे रुप आले आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यालयातील कागदपत्रे बाहेर नेण्यावर बंदी लादली आहे.
  • 2026-05-04 16:34:00

    TVK प्रमुखाचे अभिनंदन करण्यासाठी निवासस्थानी पोहोचली Trisha Krishnan

    दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय थलपतीच्या 'टीव्हीके' या पार्टीच्या यशाच्या प्रसंगी त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. विशेष म्हणजे, विजयचा विजय आणि त्रिशाचा वाढदिवस एकाच दिवशी आला आहे.
  • 2026-05-04 15:00:00

    ‘या’ 11 आश्वासनांमुळे थलापतीने TVK ला बनवले किंग

    महिलांना दरमहा रु. 2,500 ची मदत देण्याचे वचन. पक्षाने गरीब कुटुंबातील महिलांच्या लग्नासाठी ८ ग्रॅम सोने आणि चांगल्या प्रतीच्या रेशमी साड्या देण्याचे आश्वासन दिले आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग व्यक्तींना दरमहा 3,000रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचे वचन. उत्तम शिक्षण व्यवस्था देण्याचे वचन. प्रत्येक घराला 100% नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याचे वचन. 20 युनिट मोफत वीज देण्याचे वचन. दरवर्षी 6 मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे वचन. 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे कृषी सहकारी पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन. महिला बचत गटांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन. पदवीधरांना 4,000 रुपये आणि डिप्लोमाधारकांना 2,500 रुपये भत्ता देण्याचे आश्वासन. कंत्राटी कामगारांना नियमित करण्याचे आश्वासन.
  • 2026-05-04 15:20:00

    बारामतीत सुनेत्रा पवारांचा 2 लाख 18 हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व आणि विक्रमी विजय संपादन करत बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. तब्बल 2 लाख 18 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पवार कुटुंबाच्या राजकीय बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवारांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
  • 2026-05-04 15:14:00

    राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा 77,483 मतांनी विजय

    अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाचा झेंडा फडकावला आहे. 20 व्या फेरीअखेर 77 हजार 483 मतांच्या प्रचंड आघाडीने त्यांनी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
  • 2026-05-04 14:33:00

    सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा विक्रम मोडला

    बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. 165266 मतांचा जादुई आकडा पार केला आहे. त्यांना विसाव्या फेरीपर्यंंत 179,620 मते मिळाली आहेत. बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून देत राष्ट्रीय पातळीवर नोंद केली आहे. तर इतर अपक्षांना 3,830 मते मिळाली आहेत. सुनेत्रा पवार ह्या 175,790 मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा 165265 मताधिक्यानी हरवले होते.
  • 2026-05-04 13:40:00

    West Bengal Election Result 2026: बंगालमधील मुस्लिम बहुल मतदारसंघात काय आहे भाजपची स्थिती?

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या काही तासांत भाजप लक्षणीय आघाडी घेताना दिसत आहे. विशेषतः, अनेक मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्येही भाजपने आपली पकड मजबूत करत केली असून त्यांचे उमेदवार अनेक जागांवर आघाडीवर आहेत. मुर्शिदाबादमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गौरी शंकर घोष 35732 मतांनी आघाडीवर आहेत, हबीबपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जॉयल मुर्मू 28580 मतांनी आघाडीवर आहेत.मानबाजारबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मैना मुर्मू 14049 मतांनी आघाडीवर आहेत.
  • 2026-05-04 12:46:00

    Baramati By Election Result: सुनेत्रा पवारांनी एक लाखांच्या आघाडीचा टप्पा ओलांडला

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अकराव्या फेरीनंतर 95 हजार 652 मतांची आघाडी मिळवलेल्या सुनेत्रा पवारांनी आघाडीचा एक लाख मतांचा टप्पा ओलांडला आहे. बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना 1 लाख 3 हजार 709 मतांची आघाडी मिळवली आहे. बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 8057 मतं मिळाली आहेत. राहुरी मतदारसंघ पोटनिवडणूक -१० वी फेरी भाजप अक्षय कर्डिले - 49956 राष्ट्रवादी (शरद पवार गट) गोविंद मोकाटे- 8469 वंचित संतोष चोळके- 3707 अपक्ष रावसाहेब खेवरे- 4516 दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487 मतांनी आघाडीवर
  • 2026-05-04 12:00:00

    west bengal vidhan Assembly election result :ममता बॅनर्जी यांचे मंत्री अनेक पिछाडीवर

    आसनसोल उत्तरमध्ये कायदा मंत्री 6500 मतांनी मागे आहेत. बंगाल सरकारमधील इतर अनेक मंत्रीही मागे आहेत. राणीगंजमध्ये भाजप 7797 मतांनी आघाडीवर आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले, या वेळी हिंदू एकीकरण झाले सुरुवातीच्या कलांवर बोलताना, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि नंदिग्राम व भवानीपूर येथील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी म्हणाले, "भवानीपूरमध्ये मतमोजणीच्या ६-७ फेऱ्यांनंतर माझी कामगिरी चांगली होईल. नंदिग्राममध्ये मला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. भाजप सरकार स्थापन करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. यावेळी हिंदू मतांचे एकीकरण झाले आहे. मुस्लिमांनी नेहमीप्रमाणे टीएमसीला मतदान केलेले नाही. काही मते एका मुस्लिमधार्मी पक्षाला गेली आहेत. आता यात घाई करण्याची गरज नाही."
  • 2026-05-04 11:55:00

    Tamilnadu Election Result 2026: अभिनेता विजय दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांच्या कोलाथूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत. प्राथमिक ट्रेंडनुसार, अभिनेता विजय यांचा पक्ष, टीव्हीके, 88 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. मात्र, स्वत: दोन मतदारसंघातून पिछाडीवर पडले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, टीव्हीके 28 जागांवर आघाडीवर आहे. एआयडीएमके 32 जागांवर, तर डीएमके 14 जागांवर आघाडीवर आहे.
  • 2026-05-04 11:50:00

    West Bengal Vidhan Sabha Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; स्पष्ट बहुमत, भवानीपूरमधून ममता पिछाडीवर

    सकाळी 10.45 पर्यंतच्या बंगालच्या कलानुसार, भाजप 161 जागांसह, टीएमसी 121, डावे 3 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहेत. भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा १,५५८ मतांनी, तर नंदीग्राममध्ये ३,१५० मतांनी आघाडीवर आहेत.
  • 2026-05-04 10:48:00

    Bengal Election Result 2026: जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाल्ली होती झालमुडी, त्या झाडग्राम मतदारसंघात कोण आघाडीवर?

    West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून, झाडग्राम मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. याच मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारादरम्यान झालमुडीचा आस्वाद घेतला होता.
  • 2026-05-04 10:25:00

    Kerala Vidhan Sabha Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDF ने बहुमताचा आकडा ओलांडला

    Kerala Election Result 2026: केरळमध्ये, सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर असून, त्यांनी 70 जागांचा बहुमताचा आकडा ओलांडला आहे.
  • 2026-05-04 10:20:00

    Kerala Assembly election Result: सीपीआयएमने म्हटले की लढत अटीतटीची होईल.

    काँग्रेस खासदार जेबी मॅथर यांनी केरळ चुनाव निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ मोठा विजय मिळवणार आहे. आमच्या आघाडीला 100 हून अधिक, कमीत कमी 85 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, यावेळी केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनेल व यूडीएफची सरकार असेल.
  • 2026-05-04 10:00:00

    Assembly Election Result 2026: बंगालमध्ये भाजप बहुमताच्या जवळ , आसाममध्ये बहुमत पार

    बंगालमध्ये भाजपने दीडशेचा आकडा ओलांडला असून बहुमत मिळवले आहे. आसाममध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखत मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.
  • 2026-05-04 09:46:00

    Baramati By Election Result: सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी

    बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली असून मोठ्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी. राहुरीत पोटनिवडणूक निकाल अपडेट - भाजप -अक्षय कर्डिले - 16852 राष्ट्रवादी SP -गोविंद मोकाटे- 2141 वंचित संतोष चोळके- 1022 तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर
  • 2026-05-04 09:40:00

    Tamil Nadu Election Result 2026 Updates: तामिळनाडूत अभिनेता विजयच्या TVK चा जलवा, सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय!

    तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, अभिनेता विजयच्या दोन वर्षे जुन्या टीव्हीके (TVK) पक्षाने 53 जागांवर आघाडी घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सत्ताधारी डीएमके (DMK) पक्ष पिछाडीवर आहे, तर टीव्हीके राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे दिसत आहे. ट्रेंडमध्ये अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष आघाडीवर आहे.
  • 2026-05-04 09:20:00

    Assam Vidhan Sabha Election Result Live: सुरुवातीच्या कलांमध्ये आसाममध्ये भाजपने बहुमताचा आकडा केला पार

    प्राथमिक कलानुसार भाजप 61 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस केवळ नऊ जागांवर पुढे आहे. आसाममध्ये मतमोजणी सुरू आहे. जोरहाट येथील मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आसाममधील सर्व 126 विधानसभा जागांसाठी 40 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी केली जात आहे.
  • 2026-05-04 08:47:00

    WB Election Result 2026: कोलकात्यात कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात मतमोजणी सुरू

    पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी व निकालाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील 'स्ट्रॉंग रूम' परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • 2026-05-04 08:40:00

    Kerala Vidhan Sabha Election Result 2026: यूडीएफचा मोठ्या विजयाचा दावा

    काँग्रेस खासदार जेबी मॅथर यांनी केरळ चुनाव निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ मोठा विजय मिळवणार आहे. आमच्या आघाडीला 100 हून अधिक, कमीत कमी 85 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, यावेळी केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनेल व यूडीएफची सरकार असेल.
  • 2026-05-04 08:35:00

    West Bengal Election Result: सुरुवातीच्या कलांमध्ये अनेक जागांवर भाजपा आघाडीवर

    बंगाल विधानसभा निवडणुकीची मतगणना सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. उत्तर 24 परगना च्या 33 जागांपैकी तीन वर, दक्षिण 24 परगनामधील 30 जागांपैकी तीन वर तृणमूल काँग्रेस आघाडीवर तर नदियामध्ये 17 जागांपैकी तीन जागांवर तथा मालदामधील 12 जागांपैकी २ जागांवर भाजप आघाडीवर.
  • 2026-05-04 08:33:00

    Tamil Nadu Vidhan Sabha Result Live: तामिळनाडूत सत्ताधारी DMK सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर

    तमिलनाडू विधानसभा निवडणूक 2026 साठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये डीएमडीके आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे.
  • 2026-05-04 08:20:00

    West Bengal Election Result : भाजप आणि टीएमसी प्रत्येकी 5 जागांवर आघाडीवर

    बंगालमधील सुरुवातीच्या कलांनुसार भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत असून, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच जागांवर आघाडीवर आहेत.
  • 2026-05-04 07:49:00

    West Bengal Election Result :भवानीपूरमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

    निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी भवानीपूरमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. सखावत मेमोरियल स्कूलजवळील मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही बाजूंमध्ये शा [embed]https://twitter.com/i/status/2051107637576761645[/embed] ब्दिक चकमक झाली.
  • 2026-05-04 07:26:00

    West Bengal Assembly Election Update: मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल.

    राज्यातील 77 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि दुपारपर्यंत हे स्पष्ट होईल की तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सलग चौथ्यांदा सत्ता मिळवणार की जनसंघ संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीवर भाजप पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार, की निकाल यापेक्षा पूर्णपणे वेगळे लागणार.
  • 2026-05-04 05:00:00

    Assembly Election Results 2026: Exit Poll नुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाला बहुमत?

    294 जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. पी-मार्क एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 118–138, तर भाजपाला 150–175 जागा दिल्या आहेत. मॅटराइज एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 125–140, भाजपाला 146–161 आणि इतरांना 6–10 जागा दिल्या आहेत.
  • 2026-05-04 04:00:00

    Assembly Election Results 2026: Exit Poll नुसार तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता बहुमत?

    तामिळनाडू विधानसभाातील 234 जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा 118 आहे. मॅटराइझ एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 122–132, अण्णाद्रमुक आघाडीला 87–110, टीव्हीकेला 10–12 आणि इतरांना 0–6 जागा दिल्या आहेत. पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 125–145 अण्णाद्रमुक आघाडीला 65–80, टीव्हीकेला 18–24 आणि इतरांना 2–6 जागा दिल्या आहेत.
  • 2026-05-04 03:00:00

    Assembly Election Results 2026: Exit Poll नुसार आसाममधील जनतेचा कल काय?

    आसाम विधानसभेत 126 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 63 आहे. ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 88–100, काँग्रेस आघाडीला 24–36 जागा दिल्या आहेत. मॅटराइज एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 85–95, काँग्रेस आघाडीला 25–32 आणि इतरांना 6–12 जागा दिल्या आहेत. पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 68–72, काँग्रेस आघाडीला 22–26 आणि इतरांना 11–15 जागा दिल्या आहेत.
  • 2026-05-04 02:00:00

    Assembly Election Results 2026: केरळमध्ये एलडीएफ की यूडीएफ?

    केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमताचा आकडा 71 आहे. ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 49 –62, यूडीएफला 78–90 आणि भाजप आघाडीला 0–3 जागा दिल्या आहेत. मॅटराइज एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 60–65, यूडीएफला 75–85 आणि भाजप आघाडीला 3–5 जागा दिल्या आहेत. पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 55–65, यूडीएफला 70–85 आणि भाजप आघाडीला 0–3 जागा दिल्या आहेत.
  • 2026-05-04 01:50:00

    Assembly Election Results 2026: पदुच्चेरीत कोणाची सत्ता?

    पदुच्चेरीतविधानसभेच्या 30 जागांसाठी बहुमताचा आकडा 16 आहे. ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 16–20, काँग्रेस आघाडीला 6–8 आणि इतरांना 3–7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • 2026-05-04 01:00:00

    Assembly Election Results 2026: आसाममध्ये 70 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा

    आसाम काँग्रेसचे सह-प्रभारी मनोज चौहान यांनी दावा केला आहे की, काँग्रेस 70 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. ते म्हणाले की, एक्झिट पोल आणि बातम्यांच्या माध्यमातून आसाममध्ये एक खोटे वातावरण तयार केले जात आहे. खोटे एक्झिट पोल आमच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करू शकत नाहीत.
  • 2026-05-04 00:30:00

    Assembly Election Results 2026: तामिळनाडूमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण

    तामिळनाडूमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एकूण 234 विधानसभा जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये 84.80 टक्के मतदानाची नोंद झाली, जे सर्वाधिक आहे.
  • 2026-05-04 00:00:00

    Assembly Election Results 2026: 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार.

    पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. मतमोजणी सकाळी सुरू होईल आणि दुपारपर्यंत कोणत्या राज्यात कोणता पक्ष जिंकला आहे हे स्पष्ट होईल. ही निवडणूक अत्यंत रंजक ठरली आहे. अनेक राज्यांमध्ये मतदानाचे प्रमाणही वाढले आहे.