नवी दिल्ली. Tamil Nadu Election Results 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (TN Assembly Results) यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. सत्ताधारी DMK पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी इच्छुक आहे, तर तर दुसरीकडे AIDMK आणि भाजपची युती, तसेच अभिनेता थलपथी विजयच्या TVK पक्षाने निवडणुकीत रंगत आणली आहे. तामिळनाडूमध्ये मुख्य लढत डीएमके आघाडी, AIADMK आघाडी, टीव्हीके आणि एनटीके यांच्यात आहे.
मॅट्रिक्झच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी DMK आणि मित्रपक्षांना 122 ते 132 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच भाजप आणि AIDMK यांच्या युतीला 87 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर थलपती विजयच्या TVK पक्षाला 10 ते 12 आणि इतरांना 0 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे..
तामिळनाडूत यंदा विक्रमी मतदान -
तामिळनाडूमध्ये यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत, गेल्या 74 वर्षांत कधीही न घडलेला इतिहास घडला. राज्यात 85.14 टक्के मतदान झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. यापूर्वीचा विक्रम 2011साली 78.29 टक्के होता, जो यावेळी मोडला गेला. राज्यभरातील 234जागांवर मतदान पार पडले आणि सुमारे 5.73 कोटी मतदारांपैकी 85 टक्क्यांहून अधिक लोक मतदानासाठी घराबाहेर पडले.
राज्यात एकूण 234 विधानसभा जागा असून त्या सर्वांवर एकाच दिवशी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत एआयएडीएमकेला मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर, 2016 मध्ये मतदानाची टक्केवारी 74.81 टक्क्यांपर्यंत घसरली आणि 2021मध्ये ती आणखी घसरून 73.63 टक्क्यांवर आली. याचा अर्थ गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदान सातत्याने कमी होत होते. पण यावेळी ते अचानक 85 टक्क्यांच्या वर पोहोचले, जी एक मोठी वाढ आहे.
Assembly Election Results 2026: Exit Poll नुसार तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता बहुमत?
तामिळनाडू विधानसभाातील 234 जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा 118 आहे.
मॅटराइझ एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 122–132, अण्णाद्रमुक आघाडीला 87–110, टीव्हीकेला 10–12 आणि इतरांना 0–6 जागा दिल्या आहेत.
पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 125–145 अण्णाद्रमुक आघाडीला 65–80, टीव्हीकेला 18–24 आणि इतरांना 2–6 जागा दिल्या आहेत.
