कोल्हापूर. Kolhapur Pattan Kodoli Yatra : संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदि राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला आज गुरुवारपासून प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी विठ्ठल बिरुदेवाचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणूककार फरांडेबाबांनी भविष्यवाणी अर्थात भाकणूक पार पडली. भाकणुकीत फरांडेबाबांनी महागाई, राजकारण, पाऊस यावर भाष्य केले. यावरून चर्चांना उधाण आले आले.
पट्टणकोडोलीच्या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. फरांडे बाबांनी केलेल्या भाकनुकीनुसार, पुढच्या सात दिवसात पाऊस पडेल, राजकीय उलथापालथ होऊन देशावर महिला राज येईल. मिरची आणि साखरेचे दर वाढतील, इतकंच नाही तर देशासह जगभरात मोठी आंदोलनं होऊन लढाया होतील अशी भाकणुक फरांडे बाबा यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भाविक हजेरी लावली. भाविकांकडून विठ्ठल बिरूदेवाचं दर्शन घेऊन भंडाऱ्याचं उधळण केली गेली. पट्टणकोडोलीतील ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला.
