जेएनएन, मुंबई. Yellow Alert in Maharashtra: मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. आता पुन्हा पावसासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील विदर्भासह डोंगरमाथा आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
या जिल्ह्यांत अलर्ट
राज्यात IMD कडून काही भागांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पुणे घाट, सातारा घाट, परभणी, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
उद्याही नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर आणि पुणे घाट परिसरात पावसाचा अंदाज आहे. या भागात IMD Mumbai कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rainfall very likley to occur at isolated places over Ghats of Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 24, 2026
Thunderstorm accompanied with lightning, Light to moderate rain and gusty winds reaching speed 30-40 kmph, very likely to occur at isolated places over Marathwada.
मुंबई हवामान अंदाज
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंशसेल्सि असे राहण्याची शक्यता IMD Mumbai ने व्यक्त केली आहे.
