जेएनएन, मुंबई. राज्यातील अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (8 ऑगस्ट 2026) आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 3 चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 6 नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे, या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक घटना - फडणवीस

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

    मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली.

    हेही वाचा - Amravati Hospital Fire: अमरावतीत जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु विभागाला भीषण आग; NICU मधील तीन चिमुकल्यांचा मृत्यू