जेएनएन, मुंबई. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा येथील निवडणुकीत महायुतीने जोरदार फाईट देत जयंत पाटील (Jayant Patil) यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, पाटील यांनी महायुतीला जोरदार झटका दिला आहे. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष पदासह 23 जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. भाजप - 2, अजित पवार गट - 2 आणि ठाकरे सेनेला 2 जागा मिळाल्या आहेत.
- नगर परिषद - ईश्वरपूर
नराध्यक्षपदाचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी
एकूण जागा – 30
नगरसेवक निकाल
- शरद पवार राष्ट्रवादी - 23
- भाजप - 2
- अजित पवारांची राष्ट्रवादी - 3
- ठाकरेंची शिवसेना - 2
Sangli Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व
- ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय
- आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी
- तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी
- पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी
- विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी
- जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.
- आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी
- शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी..
