मुंबई. Uddhav Thackeray Raj Thackeray Yuti: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड अखेर घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर राजकीय युतीची औपचारिक घोषणा केली आहे. अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे नवा आकार मिळणार आहे.
दोन्ही बंधूंनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळवर जाऊन अभिवादन केले. यावेळी ठाकरे बंधूचे सर्व कुटुंब यावेळी उपस्थित होते.
महापालिका निवडणुक निवडणुकसाठी ही युती अत्यंत निर्णायक मानली जात आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी भागांमध्ये या युतीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कशामुळे ठाकरे बंधू एकत्र आले?
गेल्या काही महिन्यांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्ष पातळीवर चर्चा सुरू होती. भाजप-शिंदे गटाची वाढती ताकद, शिवसेनेची फूट, मराठी मतांचे विभाजन आणि मुंबईतील राजकीय वर्चस्व धोक्यात येत असल्याची जाणीव या युतीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
असे आहेत प्रमुख मुद्दे!
• मराठी अस्मितेचा मुद्दा
• मुंबई महापालिकेतील सत्ता
• मराठी मतांचे एकत्रीकरण
• ठाकरे ब्रँड पुन्हा प्रभावी करण्याचा प्रयत्न
या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.
युतीचे स्वरूप काय असेल?
प्राथमिक माहितीनुसार,
• मनसे आणि शिवसेना (उबाठा) स्वतंत्र अस्तित्व ठेवून निवडणुका एकत्र लढवणार
• महापालिका निवडणुकांमध्ये जागावाटपाचे स्पष्ट सूत्र
• मुंबई महापालिकेत ठाकरे कुटुंबाचा संयुक्त महापौर उमेदवार
• मराठी भाषिक, स्थानिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका
7 महापालिका एकत्र लढणार !
1. मुंबई महानगरपालिका (BMC)
2. ठाणे महानगरपालिका
3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
4. नवी मुंबई महानगरपालिका
5. पुणे महानगरपालिका
6. नाशिक महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका
