मुंबई - मनसे रेल्वे कामगार सेनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी 'मिसिंग लिंक'च्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, सरकारला महत्त्वाचे प्रश्न विचारणे हे जर राजकारण असेल, तर भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षात असताना केलेली सर्व आंदोलने राजकारण नव्हती का?
राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री विधानसभेत 'मिसिंग लिंक'वर राजकारण न करण्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान न करण्याबद्दल बोलतात, पण अपघातावर प्रश्न विचारण्यात राज्याचा कोणताही अपमान नाही.
भाजपनेच कठोर भाषा वापरायला सुरुवात केली-
राच ठाकरे म्हणाले की, लोकशाहीमध्ये देशातील जनतेला आपल्या सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजपनेच विरोधकांवर वैयक्तिक हल्ले आणि कठोर भाषा वापरायला सुरुवात केली होती, पण आता जेव्हा त्यांच्या विरोधात असेच वातावरण निर्माण केले जात आहे, तेव्हा त्यांना वेदना होत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर लक्ष्य साधले-
मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या 'पाहून घेऊ' या वक्तव्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित पदावर असलेल्या व्यक्तीने अशी भाषा वापरणे शोभत नाही. एका सुसंस्कृत राज्याचा मुख्यमंत्री ना तू, आणि अशी भाषा. पाहून घेऊ काय? यासोबतच राज ठाकरे यांनी असाही मोठा प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा हे सभागृह पूर्णपणे महाराष्ट्राचे आहे आणि येथील बहुतांश आमदार मराठी भाषिक आहेत, तर मुख्यमंत्र्यांना विधानसभेत अचानक हिंदीत बोलण्याची गरज का वाटली? वाटले, कदाचित त्यांना आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना इशारा द्यायचा असेल की, पाहुन घेऊ, असा चिमटाही राज ठाकरे यांनी काढला.
