जेएनएन, पुणे. Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय.
राजकीय वातावरण तापले
या घटनेवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच याप्रकरणात लक्ष्य घालून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तरुणीवर लैंगिक अत्याचार
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर गेली आहे.
कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर
या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.
अतिशय संतापजनक!
— Supriya Sule (@supriya_sule) February 26, 2025
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची…
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असं रोहित पवार यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.
शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल
संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली आहे.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 26, 2025
हेही वाचा -Railway Recruitment: रेल्वेमध्ये जॅम्बो भरती, 10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी