एजन्सी, पुणे: मंगळवारी सकाळी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेतजवळ एका कंटेनर ट्रकने वारकऱ्यांच्या दिडींत धडक दिली. या घटनेत एका महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आणि इतर 10 भाविक जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात सकाळी 6.30 च्या सुमारास झाला.
वारकऱ्यांचा हे रायगड जिल्ह्यातील उरण येथून पुणे जिल्ह्यातील आळंदीपर्यंत पायी निघाले होते. त्यांनी सांगितले की, काही वारकरी हे ऑटोरिक्षातून प्रवास करत होते.
ऑटोरिक्षाला धडक
"त्यांची 'दिंडी' आळंदीकडे जात असताना, पुण्याकडून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या कंटेनरने वारकऱ्यांना आणि ऑटोरिक्षाला धडक दिली. "घाटात उतार असल्याने कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले," असे कामशेत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला, असे त्यांनी सांगितले.
मृत महिलेची ओळख प्रियंका तांडेल (55) अशी झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. जखमी झालेल्या 10 यात्रेकरूंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रक जप्त
अपघातानंतर, इतर यात्रेकरूंसह काही लोकांनी चालकाच्या अटकेची मागणी करण्यासाठी रस्ता रोखला. "आम्ही ट्रक जप्त केला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे," असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
