जेएनएन, पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड (Rajgad) असे करण्यात (Velhe Taluka Renaming) आले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्य सरकार लवकरच अधिसूचना काढणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम राजधानी असलेल्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या तालुक्याला नवे नाव मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी नाव बदलासाठी सकारात्मक ठराव मंजूर केला होता.
पुणे जिल्हा परिषदेमध्येही यास मान्यता मिळाली होती. त्यानंतर महसूल विभागाने राज्य सरकारसमोर प्रस्ताव मांडून केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळवली आहे.
केंद्र सरकारची मान्यता!
राजगड या नावाला केंद्र सरकारचीही अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे राजपत्र लवकरच जारी केले जाणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
छत्रपतींचा मावळा असल्याचा अभिमान मला आहे.!!
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 21, 2025
• वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड
आनंदाची बातमी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव " राजगड " करण्याचा… pic.twitter.com/HTCVmfVP9I
राजगडचे ऐतिहासिक महत्त्व!
राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी दुर्ग होती. याठिकाणी असंख्य ऐतिहासिक घटना घडल्या आहेत.स्वराज्य स्थापनेचे स्वप्न सहीत महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेशी असलेle ऐतिहासिक संबंध आहेत.