जेएनएन, कोल्हापुर. Sharad Pawar Press On Ajit Pawar Meet:  पुण्यात वसंतदादा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांजवळ असलेल्या खूर्चीवरील नामफलकाची आदलाबदल केली. तसंच, यानंतर अजित पवारांसह त्यांच्या गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. यामुळे अनेकांच्या भुवया उचांवल्या होत्या तसंच, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार अशा चर्चांना ही उथाण आले होते. यावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.  

चर्चा झाली ती एका प्रकल्पाबाबत

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे तर एका प्रकल्पाबाबत केली, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. 

कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल

नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयावर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली असेही त्यांनी सांगितले. 

राजकारणाबाबत कोणतीही चर्चा 

    कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार यांनी सांगितले की, पुण्यात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आपली बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत साखर कारखान्याच्या प्रश्नावर बरचं बोलणं झालं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्यातही याबाबतच बोलणं झालं. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

    निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा

    शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. पण याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar On Uddhav Thackeray)

    मी पण वाट बघतोय

    राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रोज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे नेते संपर्कात आहेत, काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत असे सांगत आहेत, याबाबत शरद पवारांना विचारले असता, मी पण वाट बघतोय, कोण कोण जाणार आहे ते? असं शरद पवार म्हणाले.

    दावोसला गुंतवणूक करण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपचा पाठिंबा काढून घेतील असे वाटत नाही, ते डोक्यातून काढून टाका असे सांगताना पवार म्हणाले, उद्योग मंत्री सामंत हे दावोसला गुंतवणूक करण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला असा सवाल ही त्यांनी केला.