जेएनएन, ठाणे,Maharashtra politics: खरी शिवसेना कोणाची हे जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.आमच्यावर टीका केल्यास उद्धव ठाकरेकडे फक्त दोनच आमदार उरतील अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिदें यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त टीका करता येते काम करता येत नाही. आम्ही गेल्या अडीच वर्षापासून जनतेचे काम करत आहे.कामातूनच उद्धव ठाकरेला उत्तर दिले आहे अशी टीका शिंदे यांनी केली आहे. अखेर जनतेने दिलेल्या कौलानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली. त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. ते अजूनही सुधारले नाहीत, तर 20 चे दोन आमदार व्हायला वेळ लागणार नाही अशी टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ठाण्यात टेंभी नाका येथील आनंदाश्रमात बोलत होते. विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कुणाची ते सिद्ध करून दाखवले. जनतेच्या पाठबळाच्या जोरावर शिवसेना पक्षाचे 85 पैकी 60 आमदार निवडून दिले आले, तर आमच्यावर टीका करणाऱ्यांचे 97 पैकी केवळ 20 आमदार निवडून आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 80  टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही शिकवण घेऊनच शिवसेना  पक्षाची वाटचाल सुरू आहेत.यामुळे आम्ही गेली अडीच वर्षे लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला. शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या अनेक योजना यशस्वीपणे राबविले आहे असे ही शिंदे म्हणाले आहे. 

बाळासाहेब ठाकरेचे विचार  आणि शिवसेना पक्षाचे काम आणि विचार कार्यकर्त्यांनी घराघरांत पोहोचविण्यासाठी रात्र दिवस काम करावे असे आवाहन शिंदे यांनी केला आहे. शिवसेना पक्षाची सर्वसामान्य नागरिकांशी असलेली नाळ तुटनार नाही याची काळजी कार्यकर्ताने घ्यावी अशी सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.