जेएनएन, पुणे. Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Ashadhi Wari 2026: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 8 जुलै आषाढीवारी साठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पालखी आता बरड भागात आहे. माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण हे चांदोबाचा लिंब येथे पार पडले. आता पहिले गोल रिंगण कुठे आणि कधी पार पडणार हे जाणून घेऊया.
पहिले उभे रिंगण कधी व कुठे
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. ही पालखी सध्या बरड भागात आहे. ती 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पोहोचणार आहे. आणि याच ठिकाणी माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी कार्यक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही 8 जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान केले आहे आणि दि. 24 जुलै रोजी पंढरपूरला पालखी सोहळा पोहचणार आहे. या सोहळ्यादरम्यान 17 दिवस मुक्काम, 4 गोल तर 3 उभे रिंगण होणार आहे. तर आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी होणार (ashadhi ekadashi 2026 date) आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony 2026 Detailed schedule)
- 18 जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कमी असणार आहे.
- 19 जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहणार आहे.
- दि 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल.
- दि. 21 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी विसावणार आहे.
- दि. 22 जुलै रोजी ठाकुरबूवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भंडीशेगाव मुक्कामी आहे.
- दि. 23 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे. दि. 24 रोजी म्हणजेच आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत.
- दि. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.
